रोहिंग्याच्या सर्वात मोठया रिफ्यूजी कॅम्पमध्ये पोहचला ‘कोरोना’, 10 लाख लोकसंख्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगातील सर्वांना भयभीत करणाऱ्या कोरोना विषाणूने बांग्लादेशात निर्वासित असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतींमध्येही प्रवेश केला आहे. म्यानमारमधून आलेल्या निर्वासित रोहिंग्यांना बांग्लादेशाने कॉक्सबाजार येथे छावणी बांधून शरण दिली आहे. ही वस्ती प्रचंड दाट लोकवस्तीची आहे तसंच इथे प्रचंड अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. याच परिसरात आता कोरोना विषाणूनेही शिरकाव केला आहे. इथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

‘कॉक्स बाजार या निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांच्या वसाहतीतही कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तिथे आसरा घेतलेला एक आणि अन्य एकाला कोरोनाची लागण झाली आहे. या पॉझिटिव्ह लोकांना आयसोलेशन केंद्रात पाठवण्यात आले आह. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे ,’ अशी माहिती बांग्लादेश निर्वासित मदत आयोगाचे अध्यक्ष महबूब आलम तालुकदार यांनी दिली आहे. या निर्विसित छावणीमध्ये 10 लाख रोहिंग्या राहतात.