Coronavirus : 17 नोव्हेंबरला ‘हुबेई’मध्ये आढळला होता पहिला संक्रमित रूग्ण, चीनी प्रसारमाध्यमांचा दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगभरात 100 पेक्षा जास्त देशात कहर माजवणाऱ्या कोरोना व्हायरससंबंधित मोठा खुलासा झालेला आहे. हॉंगकॉंग स्थित साऊथ मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार दावा करण्यात आलेला आहे की, हुबेई प्रांतात 17 नोव्हेंबरला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मानले जात आहे की 55 वर्षीय हा रुग्ण जगभरातील संक्रमित रुग्णांपैकी सर्वात पहिला रुग्ण आहे. परंतु चीनी अधिकाऱ्यांनी याची अधिकृत पुष्टि केलेली नाही.

हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानला या व्हायरसने सर्वाधिक प्रभावित केले होते. एवढेच नाही तर हा व्हायरस जगभरातील हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशात पसरला.

या वृत्तानुसार, चीनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कमीत कमी 266 लोकांची ओळख केली जे 2019 मध्ये कोरोना मुळे बाधित झाले होते. हे सर्व हुबेई प्रांतात राहणारे आहेत.

वुहानमधील स्थिती बिघडल्यानंतर 23 जानेवारीपासून प्रांत लॉक डाऊन केला गेला होता. येथे लोकांच्या येण्यावर आणि येथून बाहेर जाण्यावर प्रतिबंध आणण्यात आले होते. जे लोक येथून गेले त्यांना स्क्रीनिंगच्या प्रक्रियेतून जावे लागले.

हुबेईतील स्थितीचा अंदाज यामुळे लावला जाऊ शकतो की, येथे 67,786 लोक अद्यापही कोरोनाने संक्रमित आहेत, तर 2,436 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तानुसार,संशोधक कोरोना व्हायरस रोखण्याचा पॅटर्न मोजण्याचा प्रयत्न केला जात आहे. संशोधक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, हा व्हायरस वैश्विक महामारीचे कारण कसे बनले.

यात सांगण्यात आले आहे की, 17 नोव्हेंबरपासून वुहानमध्ये रोज 1 – 5 रुग्ण समोर येत होते. 15 डिसेंबरपर्यंत ही संख्या 27 वर पोहोचली. तर त्यापुढील 5 दिवसात हा आकडा 60 पर्यंत पोहोचला होता.