3 महिन्यामध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संक्रमणाच्या काळात एकीकडे सर्व प्रकारच्या उत्पादनाचा खप घटत असला तरी गेल्या तीन महिन्यात (three-months) देशात तब्बल 5 कोटी (five-crore-smartphone-sales) स्मार्टफोनची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात ऑनलाइन, डिजिटल व्यवहारांमुळे (demand-due-digital-transactions) स्मार्टफोन हाच जीवनातला अविभाज्य घटक ठरल्याने आजवरच्या तिमाहीतल्या विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. येत्या उत्सव काळात त्यात आणखी भर पडेल अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

2017 च्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत 4 कोटी 8 हजार स्मार्टफोनची विक्री झाली होती. 2018 मध्ये ती संख्या कमी होऊन 4 कोटी 4 हजारांवर आली. त्यानंतर गेल्या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाल्याने विक्री 4 कोटी 60 लाखापर्यंत गेली. यंदा कोरोनाचे संक्रमण वाढत असलेल्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आजवरची विक्रमी अशी 5 कोटी फोनची विक्री झाली आहे. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्के जास्त स्मार्टफोन विकले होते. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून या तिमाहीत त्यात तब्बल 47 टक्के घट झाली. मात्र, जुलै ते सप्टेंबर या गेल्या तिमाहीत 2019 सालातील तिमाहीच्या तुलनेत 8 टक्के वाढ झाल्याचे स्मार्टफोन मार्केट प्लसची आकडेवारी सांगत आहे.

… त्यामुळे स्मार्ट फोनचे महत्व वाढले
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात फिजिकल डिस्टन्सिंगचे निर्बंध लागू झाल्यानंतर परंपरागत दैनंदिन व्यवहार आणि कामकाजावर निर्बंध आले. त्या काळात मोबाइल फोन हेच संपर्काचे एकमेव साधन ठरले. शालेय शिक्षण, कार्यालयीन कामकाज, मोठमोठ्या कंपन्यांच्या जनरल मीटिंग इतकेच काय कुटुंबांच्या गाठीभेटी या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचे महत्त्व वाढल्याने तो खरेदीची लगबग वाढली.