कोरोना व्हायरस : DGCA चा आदेश, 15 जानेवारी पूर्वी चीनला गेलेल्या परदेशी नागरिकांनी भारतात परतू नये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये नोवेल कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरूच आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. नागरी विमान उड्डाण नियंत्रण महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी म्हटले की, जे परदेशी नागरिक 15 जानेवारीपूर्वी चीनला गेले होते, त्यांना भारतात परतण्याची परवानगी दिली जाणार नाही.

डीजीसीएने एक सर्क्युलर जारी करून म्हटले आहे की, 5 फेब्रुवारीपूर्वी चीनी नागरिकांना मंजूर केलेले सर्व वीजा सस्पेंड करण्यात येत आहेत. डीजीसीएने स्पष्ट केले की, ही वीजाबंदी एयर क्रू सदस्यांना लागू होत नाही, जे चीनवरून येणारे चीनी नागरिक किंवा परदेशी नागरिक असतील.

डीजीसीएच्या आदेशानुसार 15 जानेवारी, 2020 किंवा त्यानंतर चीनला जाणार्‍या परदेशी नागरिकांना भारत-नेपाळ-, भारत-भूतान, भारत-बांगलादेश किंवा भारत-म्यानमार सीमांसह कोणत्याही विमान, जमीन किंवा बंदरातून भारतात येण्याची परवानगी नाही.

इंडियन एयर लाइन, इंडिगो आणि एयर इंडियाने चीनसाठी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. स्पाइस जेटची दिल्ली-हाँगकाँग मार्गावरील उड्डाणे सुरू राहतील.

1 फेब्रुवारीला एयर इंडियाच्या दोन विशेष विमानांनी चीनच्या वुहान प्रांतात लँडिंग केले होती ज्याद्वारे 647 भारतीयांना वुहानमधून भारतात आणण्यात आले होते. मालदीवच्या 7 लोकांनासुद्धा भारताने वुहानमधून बाहेर काढले होते. आतापर्यंत केवळ 3 भारतीय कोरोना व्हायरसने प्रभावित आहेत.