Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने 6 जणांचे ‘कोरोना’चे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढणारी एक बातमी समोर आली आहे. शहरात कोरोनाचा धोका वाढला असून आज एकाच दिवशी नवीन 6 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या आता वाढली आहे. नवीन 4 रूग्ण वायसीएम मध्ये तर 2 जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधून 4 एप्रिलपर्यंत एकुण 420 व्यक्तींचे कोरोना (COVID-19) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी शनिवारी रात्री 10.30 वाजता प्राप्त अहवालानुसार 6 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे शहरामधील आत्तापर्यंत एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 21 झालेली आहे. त्यापैकी 12 रुग्ण बरे झालेले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले असून त्यांना घरामध्ये 14 दिवस वलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या शहरातील रुग्णालयात असणाऱ्या पॉझिटीव्ह 9 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.