Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून,आज राज्यामध्ये नवीन १५ रुग्ण आढळून आल्यात. यात पुण्यातील तब्बल पाच जणांचा समावेश असून,राज्यातील संसर्गित रुग्णांची संख्या २१५ वर पोहचली आहे.तर पुण्यामध्ये आज पहिल्या रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

महाराष्ट्रात काल रात्रीपासून पुण्यात ५, मुंबईतील ३, नागपूर मधील २ तसेच कोल्हापूर व नाशिकातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात उपचारानंतर बरे झालेल्या व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. या सर्वाना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याबाबत प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहे. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like