Coronavirus : पार्टीमध्ये सोबत ओढली ‘सिगरेट’ अन् केलं ‘ड्रिंक’, ‘कोरोना’ व्हायरसची लागण झाली 11 मित्रांना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकत्र पार्टी केल्यामुळे 11 मित्रांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही बाब थायलंडची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व मित्र थायलंडचे नागरिक आहेत. एकत्र पार्टी करणारे मित्र 25 ते 38 वर्षांच्या दरम्यानचे आहेत. थायलंडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या सुमारे 75 झाली आहे.

थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, 15 जणांच्या गटाने एकत्रित पार्टी केली होती, परंतु त्यापैकी 4 जणांचा तपास अहवाल नकारात्मक होता. गटातील काही लोक 21 फेब्रुवारीला हाँगकाँगमधील एका व्यक्तीला भेटले. यानंतर, 25 फेब्रुवारीपासून लोकांना ताप, डोकेदुखी आणि कफ अशा समस्या सुरू झाल्या.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तब्येत खराब असूनही, हे लोक 27 आणि 29 फेब्रुवारी रोजी दोनदा आपल्या मित्रांसह पार्टीत सामील झाले. या लोकांनी वाइनचा एक ग्लास आणि एक सिगारेट एकत्र शेअर केली. हे लोक 4 मार्चला रुग्णालयात पोहोचले.

आरोग्य मंत्रालयाचे स्थायी सचिव सुखुम कंचनपिमाई म्हणाले- कोरोनाचा धोका असलेल्या देशातून परत आल्यावर मद्यपान करणे, सिगारेट ओढणे आणि सामाजिक कार्यापासून दूर राहणे हे अत्यंत अयोग्य वर्तन आहे. थायलंडमध्ये कोरोना विषाणूमुळे ग्रस्त 34 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याच वेळी, रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.

जगभरात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 1,45,000 पार झाली आहे, तर मृतांची संख्या 5 हजारांवर पोहोचली आहे. यावेळी संपूर्ण इटली जवळजवळ बंद आहे आणि लोकांना त्यांच्या घरात राहण्याची विनंती केली जात आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या 1266 ओलांडली आहे. गुरुवारी आणि शुक्रवार दरम्यान इटलीमध्ये केवळ 250 जणांचा मृत्यू झाला.

इटलीमध्ये आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णांची संख्याही 1300 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर संक्रमित लोकांची संख्या 17,660 पेक्षा जास्त आहे इटलीची परिस्थिती इतकी बिकट आहे की संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

इटालियन पंतप्रधान गउसेप्पे कॉन्टे म्हणाले की, इटलीत सर्व लोकांच्या प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. लोकांना केवळ आपत्कालीन परिस्थितीतच सूट मिळू शकते. इटलीमधील निर्बंधाशी संबंधित नियम मोडल्याबद्दल लोकांना दंड होऊ शकतो आणि 3 महिने तुरुंगवास ठरू शकतो.

त्याचबरोबर अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. भारतात आतापर्यंत सुमारे 82 लोकांमध्ये व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूमुळे 2 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा स्वित्झर्लंड आणि इटलीला गेला. मुलाचा उपचार सुरु आहे.