गौतम गंभीरची मोठी घोषणा ! ‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी करणार ‘एवढं’ दान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोनाच्या विरोधात भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर हे मैदानात उतरले आहेत. 20007 टी – 20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा असलेले खासदार गौतम गंभीर यांनी या माहामारीत आपले योगदान देण्याची घोषणा केली आहे.

या घातक जीवघेण्या कोरोना महामारीचा प्रकोप वाढतच आहे, जगभरात आतापर्यंत 47,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 64 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यावर मात करण्यासाठी पीएम केअर फंडची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यात कोणीही आपल्याला हवी तेवढी मदत करु शकते. ज्या निधीचा वापर कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केला जाईल.

गौतम गंभीर यांनी देखील गुरुवारी सोशल मीडियावर ट्विट कर पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देत असल्याची घोषणा केली.

त्यांनी ट्विट केले की, लोक विचारत आहेत की तुमचा देश तुमच्यासाठी काय करु शकतो? परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या देशासाठी काय करु शकतात? मी माझा दोन वर्षांचा पगार पीएम केअर फंडमध्ये दान करत आहे, तुम्ही ही पुढे या.

9 वर्षांपूर्वी गौतम गंभीर यांनी याच दिवशी 2011 वर्ल्ड कपच्या श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावांचा शानदार खेळी केली होती आणि भारताला 28 वर्षांनंतर चॅम्पियन केले होते.

गंभीर यांनी यापूर्वी देखील सांगितले होते की त्यांची गौतम गंभीर फाऊंडेशन गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण्याची सोय करत आहे, जे कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत आहेत. या अंतर्गत त्यांनी लोकांसाठी जेवणाची सोय केली आहे.