किराणा सामान आणायला गेला अन् सून घेऊन आला, आईची पोलिसांकडे धाव

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनात तरुण भाज्या आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि चक्क लग्नच करुन घरी आला. हे पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. आईने दोघांनाही घरात प्रवेश नाकारला. त्यानंतर झालेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला. बराच वेळ पोलीस स्थानकामध्ये हा गोंधळ सुरु राहिला आणि अखेर या सर्व प्रकरणावर संमतीने तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये ही घटना घडली आहे.

भाजी आणि किराणा माल आणायला जात असल्याचे सांगून हा तरुण प्रेयसीशी लग्न करुन थेट घरी घेऊन आला. त्याच्या आईने दोघांनाही घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण साहिबाबाद पोलीस स्थानकामध्ये गेले. मुलगा, त्याची पत्नी आणि आई असे तिघेही पोलीस स्थानकामध्ये उपस्थित होते. किराणा माल आणायला जातो सांगून निघाला आणि सूनच घेऊन आला. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या मुलाला घरामध्ये शिरु देणार नाही, अशा शब्दामध्ये या महिलेने भूमिका पोलिसांना सांगितली. मी याला किराणा माल आणण्यासाठी पाठवले होते हा सून घेऊन आला.

मला हे लग्न अजिबात मान्य नाही, असे माहिलेने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले दरम्यान,गुड्डू आणि त्याची प्रेयसी सविता या दोघांचे खरचं लग्न झाले आहे की नाही याबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. गुड्डूची चौकशी करण्यात आली असता त्याने आम्ही मंदिरामध्ये लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्रा या लग्नाचा कोणताही पुरावा त्याला सादर करता आला नाही. दोन महिन्यापूर्वी हरिद्वारमधील आर्य समाज मंदिरात आम्ही लग्न केल्याचा दावा या मुलाने केला आहे. साक्षीदार नसल्याने त्यावेळी आम्हाला लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) बनवता आले नाही. मी हरिद्वारला हे सर्टिफिकेट घेण्यासाठी जाणार होतो मात्र लॉकडाउनमुळे मला जात आला नाही, असेही त्याने पोलिसांना सांगितले.