Coronavirus : ‘कोरोना’च्या एकमात्र परिणामकारक औषधाची पहिल्यांदाच माहिती जाहीर, लवकर तंदुरूस्त होतायेत रूग्ण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  कोरोना विषाणूच्या रूग्णांना लाभ देणारे पहिले आणि एकमेव औषध रेमेडिसिवीरशी संबंधित डेटा प्रथमच प्रकाशित झाला आहे. सुमारे महिनाभर चाचणीनंतर अमेरिकन सरकारबरोबर काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी औषधाशी संबंधित एक अभ्यास प्रकाशित केला. डॉक्टर बराच काळापासून औषधाशी संबंधित डेटाची मागणी करत होते. माहितीनुसार वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, रेमेडिसिवीर या औषधामुळे गंभीर आजारी असलेल्या कोरोना रूग्णांना फायदा होतो. दरम्यान अमेरिकेच्या फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने आपत्कालीन परिस्थितीतही रेमेडिसिवीर औषधाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूएसच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांचे म्हणणे आहे की, रेमेडिसिवीरच्या चाचणीमुळे असे दिसून आले की, या औषधाचा सर्वात जास्त फायदा त्या रुग्णांना होतो ज्यांना केवळ ऑक्सिजनची आवश्यकता असते, परंतु व्हेंटिलेटरची नाही. हे संशोधन प्रकाशित होण्यापूर्वी, जगभरातील डॉक्टर किंवा संशोधकांकडे रेमेडिसिवीर संबंधित फारच मर्यादित माहिती होती. हे औषध गिलियड सायन्सेस नावाच्या कंपनीने तयार केले आहे.

पहिल्यांदा हेपेटायटीससाठी रेमेडेसवीर औषध तयार करण्यात आले होते. परंतु हेपेटायटीसच्या उपचारात हे औषध प्रभावी नव्हते. त्यानंतर त्याचा उपयोग इबोलावर उपचार करण्यासाठी केला जात असे. या औषधाने इबोलाविरूद्ध थोडीशी मदत केली. त्याच वेळी, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज प्रायोजित एक अभ्यास एका वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला. अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की, रेमेडीसीवीर औषध कोरोना रूग्णांचा रिकव्हरी वेळ 15 दिवसांवरून 11 दिवस कमी करण्यात यशस्वी झाले आहे.

अभ्यासात म्हटले आहे की, 1063 गंभीर रूग्णांना रेमेडीसीवीर औषध किंवा प्लेसबो देण्यात आले. ज्यांना रेमडेसिव्हिर औषध देण्यात आले होते त्यांच्यामध्ये प्लेसबोपेक्षा अधिक सुधार दिसून आला. वास्तविक, प्लेसबो ही वास्तविक औषधासारखी असते परंतु त्यामध्ये निष्क्रिय सबस्टन्स वापरला जातो.

अभ्यासाचे मुख्य अन्वेषक आणि नेब्रास्का विद्यापीठाचे डॉ. अँर्डे कलील यांनी नमूद केले आहे की, केवळ आजारी रूग्णांनाच रेमेडीसीवीर औषधाचा फायदा झाला नाही तर त्यांचा रिकव्हरी वेळही कमी झाला.

डॉ.अँर्डे कलील म्हणाले की, गोरे, काळ्या आणि लॅटिन अमेरिकन लोकांसह सर्व प्रकारच्या रूग्णांना औषधांचा तितकाच फायदा झाला. एवढेच नव्हे तर पुरुष आणि स्त्रियांमध्येही समान लाभ दिसून आला.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीशी संबंधित आणि अभ्यासाचे अन्वेषक असलेले डॉ. हेलन चू म्हणाले की, लक्षणे दिसल्यानंतर किंवा त्याच्या दहा दिवस आधी, औषध दिल्याचा परिणाम दोन्ही प्रकरणांमध्ये समान होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like