Coronavirus : ‘कोरोना’वर ‘हे’ औषध अत्यंत ‘प्रभावी’ ! अनेक रूग्ण झाले बरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरातील ६४ लाखांच्या जवळपास लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर ३ लाख ७७ च्या वरती रुग्णांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. जगातील साधारण २२८ कंपन्या इरेस पेटून कोरोना संसर्गावर लस निर्मितीच्या मागे लागल्या आहे. यात लशीबद्दल एक चांगली बातमी आली आहे. इबोला निर्मूलनासाठी तयार केलेलं एक औषध कोरोना संसर्गाच्या रुग्णांना बरे करत असल्याचं दिसून आलं आहे. जीलीड्स सांइसेज इनकॉर्पोरेशनच्या रेमडेसिविर औषधाने कोरोना संसर्गाचे गंभीर रुग्ण वगळता इतर रुग्ण बरे होत असल्याचं दिसून आलं.

कंपनीने औषध तपासण्यासाठी संसर्गित ६०० रुग्णांवर दोन प्रकारचे उपचार केले. यातील काही लोकांना औषध ५ दिवस दिल गेलं. तर काही रुग्णांना १० दिवस या औषधाने उपचार करण्यात आले. त्या रुग्णांबरोबरच मानक औषधी प्रक्रियेद्वारे उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही ठेवले होते. अकराव्या दिवशी असं आढळून आलं की, पाच दिवसांचे उपचार सुरु असलेले रुग्ण सामान्य पद्धतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा तुलनेने लवकर बरे होत आहे. तसेच, ज्या गंभीर रुग्णांना १० दिवस औषध दिल गेले त्यांच्यातही बरीच सुधारणा दिसली आहे. अगदी महिनाभरापूर्वी अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या औषधाच्या यशामुळे आम्हाला कोरोना संसर्गाविरुद्ध नवी आशा मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ. एँथोनी फॉसी यांनीही या औषधाचं कौतुक केले आहे.

फॉसी म्हणाले, या औषधामुळे कोरोना संसर्गाचे रुग्ण ३१ टक्के वेगाने बरे होत आहेत. यामुळे रुग्णांचे लवकरात लवकर बरे होण्याचा अर्थ आपण हे औषध अधिकाधिक वापरू शकतो. अमेरिकेने एप्रिल महिन्यात या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरु केलेली. ज्याचे निकाल आता समोर आले आहेत. तसेच आकडेवारीवरून रुग्णांच्या बरे होण्याचा परिणाम रेमडेसिविर औषधामुळे अधिक स्पष्ट होतो, असं त्यांनी म्हटलं. अमेरिका, युरोप आणि आशियातील ६८ ठिकाणी १०६३ रुग्णांवर औषोधोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यामध्ये असं नोंदविले गेले की, हे औषध कोरोना संसर्गित रुग्णांना लवकर बरे करू शकते.

रेमडेसिविर इबोला चाचणीत अयशस्वी झाली होती. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, कोरोना संसर्गित रुग्णांवर या औषधाचा परिणाम कमी होत आहे. ते प्रभावी नाही. मात्र, आता या क्लिनिकल चाचणीनंतर डब्ल्यूएचओचे वरिष्ठ अधिकारी मायकेल रायन यांनी यावरती बोलण्यास नकार दिला आहे. इबोलाची लस म्हणून रेमडेसिविर औषध तयार केले होते. यामुळे कोणत्याही प्रकारचे विषाणू ठार होऊ शकतात. यापूर्वी, अमेरिकेतील शिकागो शहरात गंभीर स्वरूपाच्या आजारी असलेल्या १२५ रुग्णांना रेमडेसिविर देण्यात आलं होत. त्यातील १२३ जण रुग्ण बरे झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like