Coronavirus : जगभरात संक्रमित रुग्णांची संख्या 2,86,4070 वर तर मृतांची संख्या 2,00,736

पॅरिस : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा चीनमध्ये डिसेंबरमध्ये प्रसार झाल्यानंतर कोरोना विषाणू आता एक महामारी बनला आहे. कोरोना साथीचा रोगाने आतापर्यंत 193 देशांमध्ये आपले पाय पसरले आहेत. जगभरात या विषामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 2864070 वर पोहचली आहे. तर यामुळे 200736 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 772900 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

कोरोनामुळे शुक्रवारी जगभरात 6813 जणांचा मृत्यू
कोरोना साथीच्या रोगामुळे जगभरात शुक्रवारी 6813 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान असलेल्या अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अमेरिकेत 24 तासात मृतांची संख्या 2710 च्या वर गेली आहे. ब्रिटनमध्ये 813 आणि इटलीमध्ये 415 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 195351 जणांना संसर्ग झाला आहे. तर या साथीच्या रोगामुळे इटलीत 26384 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत मृत्यूचे प्रमाण अधिक असून मृतांच्या आकडेवारीत इटलीचा जगात दूसरा क्रमांक लागतो. स्पेनमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या 223759 वर पोहचली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 22902 जाणांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये कोरोनाच्या विषाणूमुळे 161488 जण संक्रमित झाले असून फ्रान्समध्ये 22614 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत गेल्या 24 तासात 2494 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे गेल्या 24 तासात 2494 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री जॉन्स हॅपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत मृतांचा आकडा आत्तापर्यंत 53511च्या वर गेला आहे. कोरोना संक्रमित आणि मृतांच्या संख्येत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेने इटली आणि स्पेनला देखील मागे टाकले आहे. मृत्यूचा आलेख सलग तीन आठवड्यांपर्यंत खाली येत होता. परंतु शुक्रवारी मृतांची आकडेवारी अमेरिकेची चिंता वाढवणारी आहे. अमेरिकेत 9 लाख 45 हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाने सर्वाधिक थैमान घातले आहे. तर न्यूजर्सी भागात कोरोनामुळे 6 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 20 हजाराच्या वर
ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात 711 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची सख्या 20 हजाराच्या पुढे गेली आहे. 20 हजारापेक्षा अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्रिटनचा पाचवा क्रमांक लागतो. अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान हे देश ब्रिटनच्या पुढे आहेत.
इटलीत 195351 कोरोनाचे रुग्ण

इटलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 195351 वर पोहचली आहे. इटलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे संकेत मिळत आहे. शनिवारी 415 लोकांचा मृत्यू झाला असून 17 मार्च नंतर एकाच दिवसात मृत्यूची ही सर्वात कमी संख्या आहे. या युरोपियन देशात आतापर्यंत 26384 जणांचा मृत्यू झाला आहे तर 195351 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

स्पेनमध्ये मृतांची संख्या 22524 वर
स्पेनमध्ये मागील 24 तासात 378 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसांपूर्वी ही संख्या 367 होती. स्पेनमध्ये मृतांची संख्या 22524 वर पोहचली असून संक्रमिक रुग्णांची संख्या 219764 वरून 223759 पर्य़ंत वाढली आहे.