Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) हळूहळू ओसरत असतानाच आता एक आनंदाची बातमी आहे. रविवारी (दि. 20) राज्यातील 15 शहरात कोरोनामुळे एकही मृत्यूची (COVID-19 fatality) नोंद नाही. मात्र दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत आहे. रविवारी राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. रविवारी राज्यात 9101 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,19,457 कोरोना बाधित (Coronavirus) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

CBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर असंतुष्ट विद्यार्थ्यांच्या परीक्षा, सीबीएसईचे सुप्रीम कोर्टात उत्तर

रविवारी मुंबई विभाग, ठाणे, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर जिल्हा, वसई विरार आणि रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा, जळगाव शहर, सोलापूर, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड जिल्हा
आणि शहर, अकोला, सोलापूर, अमरावती, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर, भंडारा
आणि गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा आणि शहर या शहरांमध्येही कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही.

World Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम सोंग “मैं जावा कित्थे” चे टीजर लाँच, पहा विडिओ

औरंगाबाद विभागातील परभणी शहर, नाशिक विभागातील मालेगाव आणि धुळे शहरात काल प्रत्येकी एक- एक कोरोना रुग्णांची नोंद झाली.
भिवंडी-निजामपूर शहरात दिवसभरात 5, जळगाव शहरात 3 आणि चंद्रपूर शहरात 6 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Coronavirus good news for maharashtra sunday 15 cities report zero covid 19 deaths

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा