‘कोरोना’चे संक्रमण नष्ट करण्यासाठी खाजेवरचं ‘आयव्हरमॅक्टिन’ औषध ‘प्रभावी’, तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. कोरोना संक्रमण नष्ट करण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक यावर औषध शोधण्यात व्यस्त आहेत. कोरोना उपचारांसाठी गंभीर आजारात वापरता असलेल्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या औषधांचा वापर सध्या केला जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने खाजेसाठी वापरात असलेल्या औषधानं कोरोना रुग्णांचे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.

खाजेवर वापरण्यात येणारे ‘आयव्हरमॅक्टिन’ या औषधानं कोरोनापासून बचाव आणि रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात असा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाला कोरोना विषाणूपासून रुग्णांना वाचवण्यासाठी हे औषध देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या औषधाचा वापर खाज येणे, त्वचेवर चट्टे येणं, पॅरासाईट्स इन्फेक्शन यासाठी केला जातो. याशिवाय रिवर ब्लाईंडनेस, पोटातील जंतू मारण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयव्हरमॅक्टिन’ हे औषध कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. तसेच हे औषध व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखते. त्यामुळे व्हायरस संक्रमित रुग्णांच्या डीएनएशी मिळून आपली संख्या वाढवू शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.
हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी ‘आयव्हरमॅक्टिन’ ही गोळी दिली जाणार आहे. यासोबत डाक्सीसाइक्लीन हे औषधही पाच दिवसांपर्यंतरोज दोनवेळा दिलं जाणार आहे. हे औषध आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण होण्यापासून बचावासाठी पहिल्या आणि सातव्या दिवशी जेवणानंतर दोन तासांनी हे औषध दिलं जाणार आहे. पहिल्या, सातव्या आणि तिसाव्या दिवशी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना हे औषध दिलं जाणार आहे. त्यानंतरच्या महिन्यातही या क्रमानुसार औषध दिलं जाणार आहे.

फक्त 48 तासात कोरोना विषाणू नष्ट
ऑस्ट्रेलियाच्या बायोमेडिसिन डिस्कवरी इंस्टिट्यूचे डॉ. कायली वागस्टाफ यांनी एप्रिलमध्ये केलेल्या दाव्यानुसार ‘आयव्हरमॅक्टिन’ या औषधाने फक्त 48 तासात कोरोना विषाणूला नष्ट करता येऊ शकते. फक्त 24 तासात हे औषध आपले परिणाम दाखवण्यास सुरुवात करते. ऑस्ट्रेलियाच्या एंटीव्हायरल रिसर्च जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.