Coronavirus : ‘कोरोना’मुळे’ग्रॅमी अवॉर्ड’ विनर प्रसिद्ध ‘सिंगर’ अ‍ॅडम स्लेजिंजरचं 52 व्या वर्षी निधन !

पोलीसनामा ऑनलाईन :अलीकडेच अभिनेता अँड्र्यू जॅकचं कोरोनामुळं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर पुन्हा एकदा एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सिंगर अ‍ॅडम स्लेजिंजर यांचं निधन झालं आहे. अ‍ॅडम ग्रॅमी अवॉर्ड विनर होते. अचानक आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीनं इंडस्ट्रीसह अनेक लोकांना धक्का बसला आहे. अ‍ॅक्टर टॉम हॅक्सनं अ‍ॅडमच्या निधनाची बामती ट्विटरवरून शेअर केली आहे.

टॉम हॅक्सनं दु:ख व्यक्त करत लिहिलं की, “मी आज खूपच दु:खी आहे. अ‍ॅडम स्लेजिंजरच्याविना कोणताही प्लेटोन होणार नाही. त्याच्या That Thing You Do ! विना, ते एक आश्चर्य होते ज्यांना आपण COVID-19 मुळं गमावलं आहे.”

असं सांगितलं जात आहे की, काही दिवसांपूर्वी अॅडम स्लेजिंजरचा कोरोना पॉझिटीव असल्याचा रिपोर्ट समोर आला होता. यानंतर आता त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अॅडमनं 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

जगभर थैमान घालत असलेली कोरोना व्हायरसची महामारी एकानंतर एक बळी घेताना दिसत आहे. जगभरात अद्याप कोरोनाची 936045 प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय 47245 लोकांनी अद्याप कोरोना व्हायरसमुळं आपला जीव गमावला आहे.