Coronavirus Guidelines | केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे, आता लहान मुलांना मास्कची गरज नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना Corona संकटामुळे मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक Coronavirus Guidelines तत्वात पाच किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे आवश्यक नसल्याने म्हंटले आहे. देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या (डीजीएचएस) नव्या मार्गदर्शक Coronavirus Guidelines तत्वात लहान मुलांना मास्कच Mask नाही तर १८ वर्षाखालील कोरोनाची बाधा झालेल्या मुलांना रेमडेसिविर Remedacivir औषध देऊ नये, असेही म्हंटले आहे.

धक्कादायक ! अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ

आरोग्य सेवा संचालनालयाच्या माहितीनुसार पालक व डॉक्टर Doctor यांच्या देखरेखीखाली सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी children मास्क वापरण्यास हरकत नाही.
१८ वर्षाखालील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्वानी काळजी घेतली पाहिजे.
कोरोनाची मध्यम लक्षणे असलेल्या किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देणे हे हानीकारक ठरू शकते.
त्यामुळे कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवरच स्टेरॉईड्सचा वापर केला जावा.
याचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, म्हणजे स्टेरॉईड्स योग्य वेळी द्यावे,
त्यावेळी त्याचे प्रमाण आणि योग्य कालावधीसाठी करण्यात यावा.
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रुग्णाची प्रकृती पाहून त्याची एचआरसीटी HRCT करावी किंवा न करावी याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घ्यावा असेही म्हंटले आहे.

महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

दरम्यान, कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीरचा वापर करण्यात येतो.
१८ वर्षे वयाखालील कोरोनाग्रस्त मुलांच्या उपचारांत रेमडेसिविरचा वापर करू नये असे नव्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.
कारण मुलांवर उपचार करताना रेमडेसिविर परिणामकारक ठरते का किंवा त्या मुलांसाठी हे औषध किती सुरक्षित आहे.
याबद्दल अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नसल्याचे म्हंटले आहे.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती