Coronavirus : चिंताजनक ! धारावीतील ‘कोरोना’बाधितांमध्ये सर्वाधिक तरूण

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत काल कोरोनाचे 441 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोरोना रुग्णंचा संख्या 8613 वर गेली आहे. तर एकट्या धारावीतीलच कोरोना रुग्णांची संख्या 500 वर गेली आहे. आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठांना होत असल्याचे आढळून आलं असलं तरी धक्कादायक बाब म्हणजे धारावीत 21 ते 40 वयोगटातील तरुणांनाच कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

रविवारी धारावीमध्ये कोरोनाचे 94 नवे रुग्ण सापडले असून दोघांची मृत्यू झाला आहे.. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 590 वर पोहचली असून मृतांची संख्या 20 झाली आहे. आरोग्य प्रशासनाने 1 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार धारावीत 21 ते 39 वयोगट आणि 31 ते 40 वयोगटातील प्रत्येक 86 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 4 ते 50 वयोगटातील 85 लोकांना आणि 51 ते 60 वयोगटातील 53 जमांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय 10 ते 20 वयोगटातील 6 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तरुण मुले सतत घराबाहेर पडत असल्याने त्यांना कोरनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरुणांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केलं जात नाही. त्यामुळे हे तरुण कोरोनाला बळी पडत आहेत. तरुणांनी घराबाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असे पालिकेकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. तरी देखील तरुणांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने तरुणांना कोरोना होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.