अडुळसा आरोग्यासाठी बहुगुणी, ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठेवतील तंदुरूस्त, संक्रमणापासून राहाल दूर

पोलिसनामा ऑनलाइन – अडुळसा या वनस्पतीचे झाड, पान आणि फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. श्वासाच्या समस्या आणि छातीत साठून राहिलेला कफ पातळ होण्यासाठी उपयोगी असलेल्या अडुळशाचे इतरही उपयोग आहेत. कोरोनाच्या माहामारीत तर याचे सेवन आणखी लाभदायक ठरू शकते. जाणून घेवूयात याचे सेवन कसे करावे, आणि फायदे कोणते…

या आजारांवर गुणकारी

1 मुत्राविषयक आजार
लघवीला त्रास, सतत लघवी, अशा समस्येत कलिंगडाच्या बिया आणि अडुळश्याची पानं वाटून या चुरणाचे सेवन करावे.

2 टीबी
अडुळशाचे 1 पान आणि 1 लहान ज्येष्ठमधाचा तुकडा घालून पाव लिटर पाणी घालावे हे उकळवून काढा तयार करावा. या काढ्याचे सेवन टीबीवर गुणकारी ठरते.

3 मासिक पाळीच्या समस्या
अनियमित मासिक पाळीची समस्या असल्यास 10 ग्राम अडुळसा, मुळा आणि गाजर 6 ग्राम अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी आटून कमी झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड करून हा काढा प्या.

4 डोकेदुखी
डोकेदुखीच्या त्रासात डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावा.

5 श्वसनाचे विकार
अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळीचे चाटण घेतल्यास श्वसनाच्या विकारात लाभ मिळतो. दम लागणे कमी होते.