Lockdown : नैराश्य टाळण्यासाठी ‘मद्यपान’, ‘धुम्रपान’ करणे पडू शकते महागात, आरोग्य मंत्रालयाचा ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधून दूध, भाज्या आणि रेशन यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा दिली आहे. जे लोक घरात वेळ घालवत आहेत. त्यांनी या कालावधीत स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबत आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला आहे. मंत्रालयाने लॉकडाऊन दरम्यान निराशा आणि एकाकीपणातून सुटका करून घेण्यासाठी मद्यपान करु नये असे सांगितले आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या या काळात मद्यपान करणे आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरु शकते असे अरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

तंबाखू व अल्कहोलचे सेवन टाळा
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाने लोकांना निराशा व एकाकीपणावर मात करण्यासाठी तंबाखू व अल्कहोलचे सेवन न करण्याचे आवाहन केले आहे. धूम्रपान किंवा अंमली पदार्थाच्या सेवनामुळे प्रतिकार शक्तीवर वाईट परिणाम होतो. यासह त्याचा परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावरही होतो. लॉकडाऊनमुळे दररोजच्या बदलांचा आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला दिला आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
आरोग्य मंत्रालयाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच संक्रमण झालेल्या व्यक्तीसोबत वैर किंवा द्वेषभाव बाळगू नये, पपंतु त्यांना उपचार आणि सावधगिरीची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून या विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल व रुग्णाला वेळीच योग्य उपचार मिळू शकतील, असे आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनचे महत्त्व
मंत्रालयाने लॉकडाऊनचे महत्व सांगताना म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणापासून रोखणे हा आहे. तसेच स्वत:ला आणि इतरांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची सूट दिली जाते.

भीती दाखवण्याऐवजी काळजी घ्या
प्रत्येकाला जवळच्या आरोग्य केंद्राची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तेथील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. आरोग्य मंत्रालयाने हे देखील मान्य केले आहे की, लॉककडाऊन दरम्याने कोरोना विषयी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी घाबरण्याऐवजी काळजी घ्यावी असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा सामना करण्यासाठी काहीजणांकडून मद्यपान, धुम्रपान केले जाते. मद्यपान आणि धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना इतरांपेक्षा लवकर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

घरात राहून छंद जोपासा
लॉकडाऊनमध्ये लोक घरात राहून आपला छंद जोपासू शकतात. फोटोग्राफी, बागकाम, स्वयंपाक, पुस्तके वाचणे, कविता लिहिणे, चित्रकला अशा छंदातून आपला वेळ घालवू शकता. मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत बहुमूल्य वेळ घालवू शकता. तसेच सोशल मीडियावर सकारात्मक विषयात सहभाग घेऊन आपले सकारात्मक मत मांडू शकता. त्याचप्रमणे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ध्यान, योग, व्यायाम करू शकता किंवा इंडोअर गेम्स खेळू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like