Coronavirus | महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांसह देशातील 18 जिल्हे वाढवताहेत चिंता, आरोग्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Coronavirus | आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) प्रकरणांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. सोबतच रोज 100 पेक्षा जास्त प्रकरणांच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा घट होत आहे. 1 जूनला देशात 279 जिल्हे असे होते जिथे रोज 100 पेक्षा जास्त केस दाखल होत होत्या, परंतु आता ते कमी होऊन 57 जिल्हे झाले आहेत.

मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, सध्या 57 जिल्ह्यांमध्येच रोज कोरोनाची 100 पेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत.
त्यांनी म्हटले की, 222 जिल्ह्यांमध्ये प्रकरणांची संख्या कमी झाली आहे.
मर्यादित क्षेत्रात प्रकरणे वाढत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की केरळच्या 10 जिल्ह्यांसह 18 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.
या 18 जिल्ह्यांमध्ये 47.5% प्रकरणे आहेत. त्यांनी म्हटले की, 44 जिल्हे असे आहेत जिथे प्रकरणांचा पॉझिटिव्हीटी रेट 10% पेक्षा जास्त आहे. हे जिल्हे केरळ, मणिपुर, मिझोरम आणि नागालँडमध्ये आहेत. केरळात 10 जिल्हे तर महाराष्ट्रात 3 आणि मणिपुरमध्ये 2 जिल्हे आहेत.

महामारी अजून संपलेली नाही

लसीकरणाबाबत संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, आतापर्यंत एकुण 47.85 कोटी डोस दिले गेले,
ज्यामध्ये 37.26 कोटी पहिले डोस आणि 10.59 कोटी दोन डोसचा समावेश आहे.
आम्ही मे मध्ये 19.6 लाख आणि जुलैमध्ये 43.41 लाख डोस दिले.
जुलैमध्ये प्रशासित डोस मे च्या तुलनेत दुप्पट आहे.

 

त्यांनी म्हटले की काही अशी राज्य आहेत जिथे 3 कोटीपेक्षा जास्त लसीकरण डोसचा पुरवठा केला आहे. उत्तर प्रदेशला 4.88 कोटी डोस, महाराष्ट्राला 4.5 कोटी आणि गुजरातला 3.4 कोटी डोस दिले गेले आहेत.

लव अग्रवाल यांनी म्हटले की, जगभरात मोठ्या संख्येने कोरोना प्रकरणे समोर येत आहेत
आणि महामारी आजून संपलेली नाही.
भारतात दुसरी लाट अजूनही संपलेली नाही.

हिमाचल प्रदेशात प्रकरणे वाढत आहेत

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, रिप्रॉडक्शन (आर) आकड्यांचा वापर करून विकास दर आणि अ‍ॅक्टिव्ह केसचे सुद्धा मूल्यांकन केले जाते.
हे संपूर्ण संसर्गजन्य कालावधी दरम्यान एक संक्रमित व्यक्तीद्वारे उत्पन्न नवीन संसर्गाची सरासरी संख्या आहे. जेव्हा आर नंबर एक च्या वर असतो, तेव्हा याचा अर्थ आहे की, केस सतत वाढत आहेत आणि नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे.

त्यांनी सांगितले की, या आधारावर हिमाचल प्रदेशात स्थिती संवेदनशील आहे.
येथे प्रकरणे वाढत आहेत. हिमाचल प्रदेशात हा दर 1.4 आर आहे तर महाराष्ट्रात
सर्वात कमी -1 आर दर आहे.

 

Web Title : Coronavirus | health ministry pc lav agarwal more than 49 percent cases coming from kerala may to july increase in vaccination doses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar चा अड्रेस अपडेट करणे झालं एकदम सोपे, अवलंबा ‘ही’ ऑनलाइन पद्धत; जाणून घ्या

Maharashtra Government | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे 4 निर्णय

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांची तहान भागणार, मुळशीतून 5 TMC पाणी घेणार