Coronavirus : 24 तासात देशात ‘कोरोना’चे 991 नवे रूग्ण, 43 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   सह आरोग्य सचिव लव्ह अग्रवाल यांनी कोरोना विषाणूशी संबंधित माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले कि, आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील 1992 लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. देशात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 13.85 टक्के आहे. कालपासून एकूण 991 नवीन सकारात्मक प्रकरणे समोर आली असून देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 14378 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत, आणखी 43 लोकांचा मृत्यू झाला असून आत मृतांची संख्या 480 वर पोहोचली आहे.कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल चर्चा करताना लव अग्रवाल पुढे म्हणाले की, देशात मृत्यूचे प्रमाण जवळजवळ 3.3 टक्के आहे. ज्यामध्ये 0-45 वर्षे वयोगटातील 14.4 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45-60 वयोगटातील 10.3 टक्के, 60-75 वयोगटातील 33.1 टक्के, 75 वर्षांवरील रूग्णांमध्ये 42.2 टक्के एवढे आहे. म्हणजेच, मृत्यू झालेल्या 75.3 प्रकरणांत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची नोंद आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, चाचणी पद्धतीचा बारकाईने आढावा घेतल्यानंतर आयसीएमआरने राष्ट्रीय चाचणी कार्य दलाच्या सल्ल्यानुसार नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याद्वारे त्यांनी सांगितले की, रिअल टाइम पीसीआर चाचणी म्हणजे कोरोना विषाणूच्या फ्रंटलाइन चाचणीचे गोल्ड सॅन्डर्ड आहे. रिअल टाइम पीसीआर चाचणीलाच आम्ही पुष्टीकरण चाचणी मानतो जी एक रॅपिड अँटी बॉडी टेस्ट आहे, ती या चाचणीची जागा घेत नाही. रॅपिड अँटी बॉडी टेस्टचा प्राथमिक उपयोग विभागात आजाराचा शोध घेण्यासाठी केला जातो. हॉडस्पॉट्समध्ये रॅपिड अँटी बॉडी टेस्ट वापरली जाते. राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत कि, रॅपिड अँटी बॉडी चाचणीचा अहवालासही सतत पोर्टलवर अपडेट करा, जेणेकरून आम्ही त्यांचा देखील वापर करू शकू. तसेच पीसीआर चाचणी आणि रॅपिड अँटी बॉडी टेस्ट कोणत्या लोकांवर करायची, हे देखील सांगितले गेले आहे. ”

लव्ह अग्रवाल यांनी केरळमधील एका जिल्ह्याचे उदाहरण देताना म्हंटले की, “आज जे निकाल आपण पाहत आहोत ते कोविड योद्धांमुळे पाहत आहोत. केरळच्या कासारगोड जिल्ह्यात सततच्या प्रयत्नानंतर चांगले निकाल आले आहेत. या जिल्ह्यात 168 पॉझिटिव्ह प्रकरणे होती.त्यापैकी आतापर्यंत 113 रुग्ण बरे झाले आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे क्लिनिकल व्यवस्थापनावर भर देताना जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही, आज जिल्ह्यात 55 सक्रिय प्रकरणे आहेत. तसेच या संदर्भात ते पुढे म्हणाले कि, हा जिल्हा राजधानीपासून दूर बॉर्डरवर आहे. जिल्ह्यात अनेक लोक परदेशातून परत आले होते. सर्वात आधी राज्य सरकारने तेथे नियुक्त केले. प्रयोगशाळा व रुग्णालयावर भर दिला आणि लोकांना होम क्वारंटाईन केले. सामाजिक अंतरासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली. 7 ड्रोनसह देखरेख करत क्वारंटाईन लोकांवर जिओ टॅगिंगद्वारे नजर ठेवण्यात आली. एका रुग्णालयाला 4 दिवसात कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी तयार केले गेले.अशा कामगारांनी डोअर-डोअर सर्व्हेक्षण केले. शेल्टर होम आणि गरीब लोकांची रेशन व भोजन वाहतूक केली गेली. उच्च जोखीमीच्या प्रकर्णनाचा आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळेच सकारात्मक अहवाल समोर आले. हा सर्वांच्या प्रयत्नांचा निकाल असल्याचे स्पष्ट झाले.