Coronavirus : कोरोनाची 74.15 % प्रकरणे दहा राज्यातून, 12 राज्यात वाढताहेत नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सांगण्यात आले की, कोविड-19 च्या रोजच्या नवीन प्रकरणांपैकी 74.15 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह एकुण दहा राज्यांमधून आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडु, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगालसह 12 राज्यात संसर्गाच्या रोजच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.

विशेष म्हणजे देशात एका दिवसात कोविड-19 ची 3,46,786 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर संसर्गाची एकुण प्रकरणे वाढून 1,66,10,481 झाली तर उपचाराधीन रूग्णांची संख्या 25 लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी आज वाजता जारी करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये ही माहिती दिली गेली आहे. या आकड्यांनुसार एका दिवसात 2,624 संक्रमितांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 1,89,544 झाली आहे.

मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले, देशात समोर आलेल्या एकुण संसर्गाच्या प्रकरणांपैकी 74.15 टक्के महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, तमिळनाडु, गुजरात आणि राजस्थानमधून आहेत.

उपचाराधीन 66.66 टक्के रूग्य महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि केरळमधून आहेत. देशात लोकांना कोविड-19 लशीचे 13.83 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.