Coronavirus : बॉलिवूडला मोठा झटका ! मार्चपर्यंतच्या तिमाहीत तबब्ल 500 कोटींचं नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायसरचा सर्वच क्षेत्रांवर भयानक परिणाम पहायला मिळत आहे. शाळा, कॉलेज, थिएटर, शुटींग सारं काही बंद आहे. बॉलिवूड उद्योगही बुडताना दिसत आहे. हेच कारण आहे की रिलीज झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर नुकसान सहन करत आहेत. आगामी सिनेमाची शुटींग रद्द तर झाली आहेच सोबत अनेक सिनेमाांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ट्रेड अ‍ॅनलिस्टच्या मते, एका वर्षापूर्वी याच काळात म्हणजेच पहिल्या मार्च तिमाहीत तुलनेत बॉलिवूड द्याोगात 400-500 कोटींची घसरण होऊ शकते. फिल्म ट्रेड आणि एग्जीबीशन एक्सपर्ट मनीष जोहर यानं सांगितलं की, “हा इंडस्ट्रीसाठी खूप मोठा झटका आहे. आम्हाला नाही माहिती की, पुढे काय होणार आहे. 2019 च्या पहिल्या तिमाहीत 1150 कोटींचा बिजनसे झाला होता. तर यावर्षी मात्र फक्त बॉलिवू़डनं फक्त 650 कोटींचा बिजनेस केला आहे.”

बॉलिवूडमध्ये छपाक(32.54 कोटी), पंगा (15.25 कोटी), भूत (31.97 कोटी) यांसारखे सिनेमे फ्लॉप झाल्यानं चांगला काळ नव्हता असंही एक्सपर्ट सांगतात. स्ट्रीट डान्सर थ्रीडी (44.25 कोटी) आणि शुभ मंगल ज्यादा सावधान (60.748 कोटी) या सिनेमांनी ठिकठाक कमाई केली आहे.

अजय देवगणचा युद्ध महाकाव्य तान्हाजी द अनसंन वॉरियर या सिनेमानं (250.94) कोटी आणि बागी 3 हे सिनेमे हिट झाले. बागी 3 आणखी कमाई करू शकत होता.