Coronavirus : महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांची संख्या ब्रिटनपेक्षाही जास्त, देशातील रिकव्हरी रेट 65.24 %

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून कोरोनाबाधित रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य आहे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे. राज्यात काल 8 हजार 348 नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा 11 हजार 569वर पोहचला आहे.

तर, राज्यात 3 लाख 937 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्ण निरोगी झाले आहे. देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे.