Coronavirus : हॉलिवूड सुपरस्टार ‘मार्क ब्लम’चा ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू ! न्यूयॉर्कच्या रुग्णालयात घेतला अखेरचा ‘श्वास’

पोलीसनामा ऑनलाईन :हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बामती समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळं हॉलिवूड सुपरस्टार मार्क ब्लमचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवासंपासून मार्क ब्लम कोरोनाग्रस्त होते. त्यांच्या निधनानं त्यांचं कुटुंबच नाही तर पू्र्ण इंडस्ट्री आणि चाहतेही दु:खी आहेत. न्यूयॉर्कच्या रुग्णालयात मार्क यांच्यावर उपचार सुरू होते. याच रुग्णालयात उपचार घेत असताना मार्कचा मृत्यू झाला आहे.

मार्क ब्लमच्या निधनाची वार्ता त्यांची पत्नी जैनेट जैरिश हिनं ईमेलच्या माध्यमातून दिली आहे. SAG- AFTRA चे व्हाईस प्रेसिडेंट रेबेका डॅमेन यांनी मार्कच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, “ते एक चांगले अभिनेते होते. त्यांनी नव्या उत्साहात आपलं प्रत्येक काम केलं आहे. न्यूयॉर्क थिएटर कम्युनिटीच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक कामे केली. इंडस्ट्रीतही त्यांनी अनेक मोठे सिनेमे केले आहेत.

पूर्ण देशात कोरोनाचा धोका वेगानं वाढताना दिसत आहे. जगातील 199 देश कोरोनाची लढाई लढत आहेत. आतापर्यंत अनेक हॉलिवूड सुपरस्टार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.