Coronavirus | गृह मंत्रालयाने केले राज्यांना अलर्ट ! दुसर्‍या लाटेपेक्षा सुद्धा भयंकर असू शकते तिसरी लाट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Coronavirus | देशातील बहुतांश राज्यात आता कोरोना (Coronavirus) कर्फ्यूचे प्रतिबंध नियमांसह हटवण्यात आले आहेत.
बाजार, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंटसह मेट्रो आणि इतर वाहतूक (Transport) व्यवस्था पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे.
परंतु अचानक देण्यात आलेल्या या सवलतीनंतर देशातील राज्यांमध्ये जे वातावरण आहे ते पाहून गृह मंत्रालया (Ministry of Home Affairs) ची चिंता वाढली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

बुधवारी गृह मंत्रालय आणि आरोग्य विभागा (Health Department) च्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
यानंतर देशभरातील सर्व राज्यांना आरोग्य मंत्रालयाकडून निर्देश जारी करण्यात आले की, सूट मिळाली आहे परंतु कोविड (Covid) प्रोटोकॉलचे पूर्ण पालन झाले पााहिजे.
आरोग्य मंत्रालया (Ministry of Health) च्या अधिकार्‍यांनी सुद्धा या बैठकीत सांगितले जर स्थिती निष्काळजीपणाची राहीली तर तिसरी लाट खुपच भयंकर असू शकते.
सूत्रांनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला या गोष्टीची शंका आहे की, ज्या प्रकारे अचानक रस्त्यांवर गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहेत.
त्यामुळे नियंत्रणात येत असलेल्या कोरोना प्रकरणांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी याबाबतची चिंता आरोग्य मंत्रालय आणि देशातील इतर राज्यांच्या मुख्य सचिवांकडे सुद्धा व्यक्त केली आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की, गृहमंत्रालयाने आरोग्य मंत्रालयासह देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहे की,कोविड प्रोटोकॉलचे पालन न करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
विशेषता जे लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत आणि मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जावी.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार आयसीएमआर आणि कोरोनावर अभ्यास करणार्‍या संस्थांनी अगोदरच सावध केले आहे की जर आपण मिळालेल्या सवलतीसह कोविड प्रोटोकॉलचे पालन केले नाही.
तर स्थिती खुपच बिघडू शकते. मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनुसार आज सुद्धा आपल्या देशात अवघ्या 5 टक्के लोकांनाच लस दिली गेली आहे.
या महामारीवर लस हाच एक उपाय आहे.आणि आपल्याकडे अजूनही लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले नाही.
अशावेळी वेळी रस्त्यांवर निघालेली गर्दी तिसर्‍या लाटेला निमंत्रण देत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Coronavirus | home ministry alerts the states for third wave of corona virus which could be more dangerous than the second wave

हे देखील वाचा

 

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Maratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….

COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

दरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’