‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमावरून गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्र सरकारवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या नागरिकांमुळे देशात आणि देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाला जबाबदार का धरलं जाऊ नये, असा सवाल त्यांनी केला आहे.

ज्यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान रात्री दोन वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी जमातचे नेता मौलाना साद यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्यामध्ये अशी कोणती गुप्त चर्चा झाली, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. डोवल यांनी रात्री उशिरा साद यांची भेट घेण्यासाठी कुणी पाटवलं होत ? जमातच्या सदस्यांशी संपर्क करण्याचे काम एनएसएचा होता की दिल्ली पोलीस आयुक्तांचा ? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केंद्रावर केला आहे. तसेच अनेक प्रश्न उपस्थित करत जमातशी सरकारचे लागेबंध असल्याचा आरोप केला आहे. मरकजजवळ निजामुद्दीन पोलीस ठाणे असूनही कार्यक्रम का रोखला नाही. केंद्री. गृहमंत्रालयाने दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी का दिली, असा प्रश्न देशमुख यांनी केला आहे.