पुणेकरांनो सावधान ! ‘हे’ कोरोनाचे 5 नवे Hotspot !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुणे महानगरपालिकेअंतर्गत असणाऱ्या वॉर्डात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरत आहे. दिवसागणिक कोरोना धोका वाढत चालल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अशा 5 वॉर्डाबद्दल माहिती दिली आहे जे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. यात सिंहगड रोड, वार्जे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुंढवा, अहमदनगर रोड-वडगाव शेरी या भागांचा समावेश आहे.

पुण्यात आज नव्यानं 1621 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत ज्यामुळं खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंत 1 लाख 38 हजार 951 एवढा झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात एकीकडे पुणेकरांना यश येताना दिसत आहे मात्र आता पुण्यातील या 5 भागांमध्ये नवे हॉटस्पॉट तयार होत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळं 41 लोकांनी जीव गमावल्यानं मृतांचा आकडा 3296 वर पोहोचला आहे. दिवसभरात एकूण 1256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि सक्रिय रुग्णांची संख्या 17,773 वर पोहोचली आहे. पुण्यात एका दिवसात जवळपास 6 हजार 142 लोकांचे नमुने घेण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी टेस्टींगचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 6 लाख 1 हजार 91 वर पोहोचली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like