Coronavirus : कोरोना संक्रमितांनी घरीच सेल्फ आयसोलेशनमध्ये कसे रहावे? लवकर रिकव्हरीसाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रोज सरासरी तीन लाख रूग्ण सापडत आहेत. बेड, औषधे, ऑक्सीजनची प्रचंड टंचाई भासत असल्याने लोक अस्वस्थ आहेत. यासाठी मेडिकल एक्सपर्ट वारंवार सांगत आहेत की, सर्वच पॉझिटिव्ह रूग्णांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्यात हलकी लक्षणे असतील तर घरीच राहून कशाप्रकारे खबरदारी घेवून लवकर बरे होऊ शकता ते जाणून घेवूयात…

लक्षणे ओळखा अन् आयसोलेट व्हा

सर्दी-खोकला, ताप, थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी, घशात खवखव, तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता बंद होणे, श्वास घेण्यास त्रास, यापैकी कोणतेही लक्ष दिसले तर कोरोना असू शकतो. अशी लक्षणे घरातील सदस्यात दिसल्यास त्यास ताबडतोब आयसोलेट करा, कारण इतरांना सुद्धा कोरोना होऊ शकतो.

टेस्ट करा

कोरोनाची लक्षणे दिसल्यास टेस्ट करा. पॉझिटिव्ह असल्यास खबरदारी घ्या, संसर्ग पसरू देऊ नका.

पॅनिक होऊ नका

पॉझिटिव्ह असल्यास पॅनिक होऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. हलकी लक्षणे असतील तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता नाही.

सेल्फ आयसोलेशनमध्ये कसे रहावे?

– कोरोना पॉझिटिव्ह आढळलात तर अशा खोलीत रहा, जिथे चांगले व्हेंटिलेशन असेल.

– भांडी, टॉवेल आणि संपर्कात येणार्‍या वस्तू वेगळ्या ठेवा. कोणतीही वस्तू शेयर करू नका.

– खोलीच्या बाहेर जाऊ नका. खोलीत कुणाला येऊ देऊ नका.

– जास्तीत जास्त विश्रांती घ्या. हेल्दी डाएट घ्या आणि डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

– डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी ऑक्सीजन लेव्हल तपासत रहा.

– मेडिकल एक्सपर्टनुसार, आयसोलेशन पीरियड किमान 14 दिवसांचा असावा.

– आयसोलेशनमध्ये सुद्धा मास्क लावा, खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू वापरा. सतत धुवा.

– बाथरूम शेयर करू नका. शक्य नसेल तर संक्रमित व्यक्तीच्या वापरानंतर बाथरूम सॅनिटाइज करा.

कधी जावे हॉस्पिटलमध्ये?

– श्वास घेण्यास त्रास

– ऑक्सीजन लेव्हल कमी होणे

– छातीत वेदना

– ओठ निळे पडणे

जर ही लक्षणे आढळली तर घरी थांबण्याची चूक करू नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा आणि त्यांनी सांगितल्यास अ‍ॅडमिट व्हा.