Coronavirus : तुमची रोगप्रतिकारशक्ती ‘पावरफूल’ आहे की ‘कमजोर’ हे कसं ओळखायचं? जाणून घ्या

दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाधितांचा आकडा पाहता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे अशा लोकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच दक्षता घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून मिळतो. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. त्या लोकांवर विषाणूचा हल्ला लवकर होतो. तसेच, मजबूत रोग प्रतिकारशक्ती असणारे रुग्ण विषाणूच्या परिणामांपासून पटकन ठीक होतात.

व्यक्तीच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी, ऍन्टीबॉडीज आणि अन्य अनेक तत्व मिळून रोगप्रतिकार प्रणाली तयार होते. हीच रोगप्रतिकार प्रणाली आपलं विषाणू पासून संरक्षण करेत. ज्यांनी रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते असे लोक वातावरणात बदल झाल्यावरही पटकन आजारी पडतात. कोव्हीड संसर्गाच्या काळात रोग प्रतिकारशक्तीवर चर्चा केली जात आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा, व्यायाम, पौष्टिक जेवण आणि जीवनशैली असणे गरजेचं आहे. पण आपली रोग प्रतिकारशक्ती किती मजबूत आहे हे ओळखणे आजच्या काळात गरज आहे. तर यावरून मजबूत प्रतिकारशक्ती ओळखण्याच्या टीप्स जाणून घ्या.

कसं ओळखाल कमजोर रोग प्रतिकारशक्ती?
> वातवरणातल्या बदलाचा शरीरावर लवकर परिणाम होत असेल. वातावरण बदललं की लगेज सर्दी, खोकला, ताप येत असेल तर, अशा लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते.
> ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते असे लोक वर्षामधून कधीनाकधी आजारी असतात. त्य़ांना आरोग्य समस्या जास्त असतात.
> रोग प्रतिकारशक्ती कमजोर असलेल्यांना फूड पॉयझनिंग लवकर होतं. बाहेरचं खाल्यांने त्यांना पोटाच्या समस्या होतात.
> डोळ्याखाली काळी वर्तूळ येणाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते.
> रात्री पूर्ण झोप घेऊनही फ्रेश वाटत नसेल, तर, हे कमजोर इम्युनिटीचं लक्षण आहे.
> अशा माणसामध्ये दिवसभर उर्जा पातळी कमी असते. त्यांना सतत थकवा जाणवतो, झोप येत राहते.
> अन्न पचन क्षमता कमजोर असते. पचन चांगल नसल्याने पोटाशी संबंधीत समस्या येत असतात.
> कमजोर रोग प्रतिकारशक्तीचं एक लक्षण म्हणजे, चिडचिडा स्वभाव. हे लोक कोणत्याना कोणत्या कारणाने चिडचीड करत असतात.

कसं ओळखाल मजबूत रोग प्रतिकारशक्ती?
> मजबूत रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना साध्या व्हायरल इन्फेक्शन मध्ये औषधं घेण्याची गरज पडत नाही.
> ज्यांची रोग प्रतिकारशक्ती असते असे लोक, व्हायरल इन्फेक्शन आणि कोणत्याही छोट्या आजारात लगेच बरे होतात.
> अशा लोकांना सर्दी खोकला वारंवार होत नाही. झाला तरी लगेच बरा होतो.
> रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या जखमाही लवकर भरतात. त्यांना शरीरावर जखम झाली तरी बरी होण्यासाठी जास्त औषधांची गरज पडत नाही.

रोग प्रतिकारशक्तीसाठी आहार –
> हेल्थलाइननुसार जेवणात सायट्रीक फ्रूटचा समावेश करावा, लिंबू, द्राक्ष, किवी, संत्र अशा फळांचं सेवन करावं.
> लाल शिमला मिरची, ब्रोकोली, लसूण, आलं, पालक यासारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट, व्हीटॅमीन सी आणि रोग प्रतिकारशक्ती बुस्टींग प्रॉपर्टीज असतात.
> दह्यामध्ये व्हिटॅमीन डी असतं. ज्यामुळे रोगप्रतिकार प्रणाली मजबूत होते.
> काजू, बदाम, मनुका, पिस्ता या सारखे ड्रायफ्रुट खावेत.
> पपई, ग्रीन टी चिकन, अंडी असे पदार्थ खाल्ल्यानेगी रोगप्रतिकार प्रणाली मजबूत होते