भाज्या-फळे धुण्यासाठी ‘या’ 4 वस्तू वापरून तयार करा आयुर्वेदिक होममेड सॅनिटायजर, जाणून घ्या कृती

पोलिसनामा ऑनलाइन – बाजारातून आणलेल्या भाज्या-फळं हँड सॅनिटायजरने किंवा साबणाने धुतल्यास भाज्यांची गुणवत्ता खराब होते तसेच आरोग्यासाठीही हे नुकसानकारक ठरू शकतं. भाज्या साबण किंवा डिटर्जंटने धुवून खाल्ल्याने पोटदुखी आणि इतर समस्या होत आहेत. जर्मन फेडरल इन्स्टिट्यूट फॉर रिस्कअसेसमेंटच्या एका रिसर्चनुसार, फळं आणि भाज्यांमधून तुमच्यापर्यंत व्हायरस पोहोचू शकतो. तर कॅनडातील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फूड सेफ्टीचे डायरेक्टर जेफ फॉर्बर यांच्यानुसार, खाण्याआधी फळं आणि भाज्यांना साबणाने धुणे घातक ठरू शकतं. यासाठी भाज्या-फळं धुण्यासाठी होम मेड आयुर्वेदिक सॅनिटायजर कसं बनवायचं ते जाणून घेवूयात.

हे साहित्य वापरा

1 एक कप कडूलिंबाची पाने
2 एक कप पाणी
3 बॉटल स्प्रे करण्यासाठी
4 एक चमचा बेकिंग सोडा

असं करा तयार
सर्वातआधी कडूलिंबाची पाने धुवून घ्या. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात पाने टाका. हे कमी आचेवर गॅसवर ठेवा. पाणी 15 ते 20 मिनिटे उकळू द्या. पाण्याचा रंग हिरवा होईपर्यंत उकळू द्या. पाणी हिरवं झाल्यावर थंड होऊ द्या. नंतर त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि चांगल्याप्रकारे मिश्रित करा. आता हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाका. बाहेरून आलेल्या भाज्या आणि फळं आधी साध्या पाण्याने धुवा. त्यानंतर होममेड सॅनिटायजरने त्यावर स्प्रे करा आणि काही वेळ तसंच राहू द्या. भाजी करायची असेल तेव्हा पुन्हा साध्या पाण्याने भाजी धुवून घ्या.