Coronavirus : 10 ते 2000 पर्यंतच्या नोटा कशा हाताळायच्या अन् बॅकिंग कसं करायचं, IBA नं सांगितल्या ‘सेफ्टी टिप्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या ३०० च्या पुढे गेली आहे आणि देशाच्या इतर राज्यात देखील ही संख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेता भारतीय बँक असोसिएशनने (IBA) काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्याच्या सहाय्याने बँक कर्मचारी आणि खातेदार कोरोना विषाणूपासून वाचू शकतात. हा आजार संक्रमित लोकांपासून दुसऱ्या निरोगी लोकांपर्यंत पसरतो, म्हणून हा प्रसार टाळण्यासाठी आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे खूप महत्वाचे आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना आवाहन केले आहे की, गरजेचे नसेल तर प्रवास टाळावा आणि शक्य असेल तर घरी बसूनच काम करण्याचा प्रयत्न करावा. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, बहुतेक बँक कर्मचार्‍यांना घरीच राहू देण्याची आयबीएची इच्छा आहे. यासह ते म्हणाले, फार महत्वाचे काम असेल तरच बँक शाखेत जावे आणि जास्तकरून ऑनलाईन सुविधेचा वापर करावा जेणेकरून बँक कर्मचार्‍यांशी संबंध कमी येतील.

आयबीएने लोकांना काही संरक्षणात्मक सूचना दिल्या आहेत-

– आयबीएने खातेदारांना बँक शाखेत जाण्यास मनाई केली आहे व इंटरनेट बँकिंग सुविधा, घरबसल्या मोबाईल बँकिंगचा वापर करून ऑनलाईन बँकिंग करण्यास प्रोत्साहित केले.
– ग्राहक RTGS, NEFT इ. सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट पर्यायांचा उपयोग रोख रकमेद्वारे किंवा बँक शाखेत न जाता चेकद्वारे हस्तांतरित करण्यासाठी करावा.
– फेस-टू-फेस मीटिंग टाळण्यासाठी आयबीएने असे आवाहन केले आहे की लोकांनी कर्ज घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा.
– कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बँकिंग असोसिएशनने लोकांना पेमेंटसाठी नोटांच्या ऐवजी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचा सल्ला दिला आहे.
– चलनात पैसे भरण्यास किंवा बॅंकेच्या शाखेत फिजिकल बँकिंगसाठी गेल्यास वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी.
– आयबीएच्या मते, यासाठी आपण आधी आणि नंतर कमीतकमी २० सेकंद आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

म्हणूनच, एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही भारतीय बँक असोसिएशनने दिलेल्या सुरक्षितता सूचनांचे पालन केले पाहिजे. जेणेकरून COVID-19 चा प्रसार थांबविण्यासाठी मदत होईल.