दर 100 वर्षांनी जगात येते ‘महामारी’, 400 वर्षात ‘या’ 4 मोठ्या साथींच्या आजारांनी घेतले लाखो ‘बळी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मानवी इतिहासामध्ये दर १०० वर्षांनी जगात मोठ्या रोगाची साथ येत असते. मागील ४०० वर्षांत अशा रोगांमुळे लाखो लोकांचा जीव गेलेला आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना १०० पेक्षा अधिक देशात पसरला असून, लाखो लोकांना त्याची लागण झालेली आहे आणि हजारो लोकांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे.

1) प्लेग
१७२० साली जगामध्ये प्लेगची मोठ्या प्रमाणात साथ आली होती. त्यामध्ये, सुमारे १ लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. या रोगाला ‘द ग्रेट प्लेग ऑफ मार्सिले’ असे म्हण्टले जाते. मार्सिले हे एक फ्रान्समधील शहर आहे. प्लेग चा रोग पसरताच एक ते दोन वर्षांत १ लाख लोकांचा बळी गेला.

2) कॉलरा
१८२० साली आशिया खंडामध्ये कॉलराची साथ आली होती आणि काही दिवसांतच या साथीने आपले मोठे रूप धारण केले होते. हा रोग ओमान, मॉरिशस, फारस च्या आखातात, भारत, मनिला, जावा, बँकॉक आणि सीरियात पसरला होता. या साथीमुळे जावा बेटांवर सुमारे १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. थायलंड, फिलिपाइन्स आणि इंडोनेशियात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली होती.

3) स्पॅनिश फ्लू
१९२० साली पूर्ण जगभरात स्पॅनिश फ्लू ची साथ पसरली होती. ही साथ १९१८ पासून सुरु झाली होती परंतु, त्याचा प्रभाव १९२० पासून जगावर होण्यास सुरुवात झाली. यामध्ये १ कोटी ते ५ कोटी लोकं मृत्युमुखी पडले होते.

4) कोरोना
२०२० साली कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसचा उगम हा चीनमधील वुहान शहरातून झाला असून, यामध्ये साडे तीन ते चार हजार लोकांचा प्राण गेला आहे. सुमारे १ लाख लोकांना याची लागण झालेली आहे. भारतात ७० हुन अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.