Coronavirus : आईस्क्रिममुळे ‘कोरोना’ होत नाही, खप घटल्यामुळे ‘अमूल’ कडून जनजागृती

अहमदाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन –   स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारची जनजागृती सध्या प्रसिद्धी माध्यमांतून सुरू आहे. पण ‘कडक उन्हाळ्यात सगळ्यांच्या आवडीचं आईस्क्रीम कृपया खरेदी करून खा’ अशी जनजागृती करण्याची वेळ अमूल – The taste of India कंपनीवर आली आहे. कंपनीचे एमडी आर. एस. सोढी यांनी एक व्हिडिओ संदेश ट्विट करून लोकांना आईस्क्रीम खाण्याचं आवाहन केलं आहे. थंड पदार्थ खाल्ल्याने कोरोना होण्याची शक्यता आहे असा समज समाजात पसरल्यामुळे लोकांनी आईस्किम खाणं थांबवलं. त्याचा फटका अमूलसह सर्वच आईस्क्रीम कंपन्यांना बसला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत देशातील आईस्क्रिमच्या विक्रीत मार्च महिन्यात 95 टक्के तर एप्रिल महिन्यात 85 टक्के इतकी मोठी घट झाली आहे. सोढी म्हणाले, ‘WHO, FSSAI आणि गुजरात सरकारच्या वतीने आईस्क्रीम खाण्यामुळे कोरोना होत नाही हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आईस्क्रीम खाण्यास हरकत नाही. अशी जनजागृती आम्ही करत आहोत आता लोकांना आईस्क्रीम खायला सुरुवात केली आहे. ‘