Coronavirus : सरकारची नवीन ‘गाइडलाइन’ ! ‘कोण-कोण’ घेऊ शकतात मलेरियाचे औषध ‘हाईडॉक्सीक्लेरोक्वीन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने मलेरियाचे औषध हाईडॉक्सीक्लेरोक्वीन कोणी घ्यावे, याविषयी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. त्यानुसार आता गैर कोविड १९ हॉस्पिटलमध्ये काम करणारे तसेच लक्षण न दिसणारे वैद्यकीय कर्मचारी, कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तावर काम करणारे पोलीस कर्मचारी तसेच कोरोना प्रसार रोखण्यासाठी काम करणार्‍या निमलष्करी दलातील कर्मचारी खबरदारी म्हणून हाईडॉक्सीक्लेरोक्वीन हे औषध घेऊ शकतात. तशी शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी आपण खबरदारी म्हणून दररोज हाईडॉक्सीक्लेरोक्वीन ची एक गोळी घेतो, असे जाहीरपणे सांगितले होते.

त्यामुळे खबरदारी म्हणून कोण कोण ही गोळी घेऊ शकतो, याची मोठी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे नॅशनल ट्राक्स फोर्सने नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यात प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी, डॉक्टर यांनाही हाईडॉक्सीक्लेरोक्वीन ची गोळी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आइसीएमआर द्वारे या गोळीबाबत संशोधन करण्यात आले. पुण्यातील एनआयव्हीमध्ये हाईडॉक्सीक्लेरोक्वीनवर तपासणी करण्यात आली.

त्यात या गोळीमुळे संक्रमण दर कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर एक ताकीदही देण्यात आली आहे़ ही गोळी घेतली म्हणजे तुम्ही एकदम सुरक्षित झालात असे समजू नये. आवश्यक ती खबरदारी बाळगली पाहिजे.  ज्यांना डोळ्यांचा आजार आहे यांनी ही गोळी घेऊ नये. रेटिनाचा त्रास होतो आहे, त्यांनी ही गोळी घेऊ नये. तसेच उच्च रक्त दाब, ह्दयासंबंधित काही आजार असेल. गर्भवती आणि बाळाला दुध पाजणार्‍या माता, १५ वर्षाखालील मुले यांना ही गोळी देऊ नये, अशी ताकीद देण्यात आली आहे.

You might also like