Coronavirus : ‘कोरोना’से डरोना ! विशेष पोलिस महानिरीक्षकानं गायलं ‘हम होंगे कामियाब’, दिला ‘हा’ संदेश (व्हिडीओ)

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार घातला आहे. देशातील जवळपास सर्वच ठिकाणची परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात आहे. मध्यप्रदेशातील इंदौर शहरात आतापर्यंत 298 कोरोनाबाधित आढळले असून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील विशेष पोलिस महानिरीक्षक विवेक शर्मा यांनी हम होंगे कामियाब हे गाणं गाऊन पोलिस दलातील सर्वांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

‘कोरोना’से डरोना असं त्यांनी सांगितलं आहे. इंदौर शहरातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. राज्यातील सर्वसामान्यांचं मनोबल वाढविण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. हम होंगे कामियाब या गाण्यात मोठा संदेश दिला गेला आहे. आम्ही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर कोरोनाचा पराभव होईल असं त्यांनी पोलिस दलातील जवानांना सांगितलं आहे. त्यांनी सर्व जवानांना पॉझिटिव्ह राहण्यास सांगितलं आहे.