Coronavirus Impact : ‘चिकन’, ‘मटण’ व ‘मासे’ खाल्ल्यामुळं फोफावत नाही ‘कोरोना’ व्हायरस, फक्त अफवेमुळं 10 कोटी लोकांच्या रोजगारावर ‘संकट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मांसाहारी (नॉनव्हेज) जेवण केल्याने कोरोना व्हायरस होतो ही अफवा पसरल्याने पोल्ट्री, मासे आणि मांस विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय चौपट झाला आहे. यामुळे फक्त पोल्ट्री व्यवसायाचेच 15 ते 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. तर चिकन, मांस आणि मस्त्य उद्योगाचा पुरवठा करणारे10 कोटी लोकांवर रोजगाराचे संकट आले आहे.

याच चिंतेने सरकाराने आता स्पष्ट केले की चिकन, मांस किंवा मासे खाल्याने कोरोना व्हायरस होत नाही. केंद्रीय पशुपालन, पोल्ट्री आणि मत्स्य मंत्री गिरिराज सिंह यांनी याच्या समर्थनात जागतिक पशु आरोग्य संघटनेचा अहवालाचा आधार घेत सांगितले की नॉनव्हेज खाल्याने कोरोना व्हायरस पसरत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले की शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लोकांना या अफवांकडे लक्ष न देण्याचा आवाहन करावे. ते म्हणाले की, चिकन, अंडे, मांस, मासे खाल्याने कोरोना पसरत नाही. ते म्हणाले की याची वैज्ञानिक पृष्टी झालेली आहे.

केंद्रीय पशुपालन, डेअरी आणि पोल्ट्री राज्यमंत्री डॉक्टर संजीव बालियान यांनी सांगितले की सोशल मीडियासह अन्य माध्यामातून पसरलेल्या या अफवेने 15 ते 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पोल्ट्री चालवणाऱ्यांना पहिल्याच्या तुलनेत एक चतुर्थांश मूल्य मिळत आहे. परंतु किरकोळ विक्री करण्यावर याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही हे विशेष आहे.

यासह बाजारात मका आणि सोयाबीनची मागणी घटली आहे. ज्यामुळे शेतकरी देखील त्रस्त आहेत. याची मागणी पोल्ट्रीत फिडिंगसाठी होते. बालियान म्हणाले देशात 15 कोटी बकरे- बकऱ्यांची संख्या आहे तर 4.7 कोटी मेंढ्या आहेत.

अफवेचा परिणाम मांस, मासे आणि पोल्ट्री सल्पाय चेनवर होत आहे. ज्यातून कोट्यावधी लोकांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, वर्षाला 75,000 कोटी रुपयांचे म्हशीचे मांस आणि समुद्री उत्पादनांची निर्यात होते. आम्ही हे वाढवून दुप्पट करु इच्छित आहोत. सिंह म्हणाले, अफवा पसरल्याने नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांना संबंधित पत्र पाठवण्यात आले होते.