Coronavirus Impact : देशातील बाजार ठप्प ! सोन्याची विक्री गाठणार 25 वर्षातील ‘निच्चांक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. ज्याच्या परिणाम सर्वच घटकांवर दिसून येत आहे. त्याच वेळी या व्हायरसमुळे देशातील सोन्याची विक्री 25 वर्षातील सर्वात कमी स्तरावर घसरण्याची शक्यता आहे. जवळपास 30 टक्क्यांनी सोन्याच्या विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून बाजारपेठ बंद असल्याने सोन्याच्या विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे, चालू आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथदेखील 11 वर्षातील सर्वात निच्चांकी स्तर गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी सांगितले कि, गेल्यावर्षी देशात 690 टन सोन्याची विक्री झाली होती. दरम्यान या आकड्यामध्ये यावर्षी 30 टक्के घट होऊन 483 टनच सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे. 1985 मध्ये सर्वात कमी सर्वात कमी म्हणजे 485 टन सोन्याची विक्री झाली होती. त्यानंतर यंदा 25 वर्षानंतर एवढी कमी विक्री होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या मते सोन्याची मागणी 40 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शॉपिंग मॉल्स, दुकाने बंद आहेत. एवढेच नव्हे तर देशातील सर्वात मोठे ज्वेलर्स टायटनने देखील 29 मार्चपर्यंत त्यांची सर्व स्टोर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद केले आहे. तसेच मुंबईतील सर्वात मोठे मार्केट झवेरी बाजार सुद्धा पुढील नोटीस येईपर्यंत बंद असणार आहे.