Pune : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आढावा बैठकीनंतर दिली ‘ही’ महत्वाची माहिती, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले. ‘महाराष्ट्रासाठी 1121 व्हेंटिलेटर्स पुढील तीन-चार दिवसांत दाखल होतील’, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीनंतर जावडेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत, त्यांचे आपण पालन केले पाहिजे. पुणेकर जनतेने आज जनता कर्फ्यूसारख्या भावनेने कोरोना कर्फ्यूचे अतिशय उत्तम पालन केले. याबद्दल पुणेकर जनतेला निश्चित धन्यवाद दिले पाहिजे. तसेच आता व्हेंटिलेटर्सचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी लगेच 1121 व्हेंटिलेटर्स पुढील तीन-चार दिवसांत दाखल होतील. यातील 700 गुजरातमधून तर 400 आंध्र प्रदेशमधून येत आहेत. ऑक्सिजन देखील औद्योगिक उत्पादन जिथे होते तिथून, ऑक्सिजन मिळण्यासाठी देखील केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला 1 कोटी 10 लाख एवढे डोस मिळाले आहेत. 1 कोटींपेक्षा अधिक केवळ तीन राज्यांनाच मिळाले आहेत. यामध्ये राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये आहेत. त्यापैकी 95 लाख कालपर्यंतचे आहेत. सध्या 15 लाख 63 हजार लसींची मात्रा शिल्लक आहेत, असेही ते म्हणाले.