‘कोरोना’ रूग्णांच्या रक्तातून मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती, होईल ‘हा’ फायदा

लंडन :  पोलीसनामा ऑनलाइन  –  संशोधकांनी कोविड-19 रूग्णांच्या रक्तातून असे प्रोटीन्स शोधले आहेत, जे आजाराचे गांभिर्य आणि तीव्रतेशी संबंधीत आहेत. हा शोध, त्यांचा आजार पुढे कोणते रूप घेईल, यावर सूचना उपलब्ध करणार्‍या संकेतांची ओळख करण्यास मदत करेल.

संशोधकांनी म्हटले की, कोरोना व्हायरस सार्स-सीओव्ही-2 च्या संसर्गाबाबत लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.

त्यांनी म्हटले की, काही रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे विकसित होत नाहीत, तर काहींना गंभीर आजार होऊ शकतो. तसेच मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

सध्या अभ्यासानुसार, संशोधकांनी बायोमार्करसाठी कोविड-19 रूग्णांमध्ये प्लाझ्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रक्त घटकाचे मूल्यमापन केले, जो आजाराचे गांभिर्य आणि त्याच्या विकासाचा क्रम याविषयी अंदाज लावण्याची विश्वासार्ह पद्धत उपलब्ध करू शकतो.

ब्रिटेनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटचे मार्कस रालसर यांच्या नेतृत्वात संशोधकांनी कोविड-19 रूग्णांच्या रक्ताच्या नमण्यांमधील प्लाझ्मा घटकात विविध प्रोटीनच्या स्तराचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक विश्लेषणात्मक तंत्रज्ञानाचा वापर केला.

या पद्धतीने वापर करून त्यांनी कोविड-19 च्या रूग्णांच्या प्लाझ्मामध्ये विविध प्रोटीन बायमार्कर शोधून काढले, जे त्यांच्या आजाराच्या गांभिर्याशी संबंधीत होते.

अभ्यासात, संशोधकांनी 31 महिला आणि पुरुषांच्या प्लाझ्माचे परिक्षण केले जे गांभिर्याच्या वेगवेगळ्य स्तराचे कोविड-19 साठी उपचार करत होते.

त्यांना रूग्णांच्या रक्तात 27 प्रोटीन आढळले, जे आजाराच्या गांभिर्याच्या प्रमाणात वेगवेगळ्या मात्रेत होते. संशोधकांनुसार, हे परिणाम जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरतील. हा अभ्यास सेल सिस्टम्स अंकात प्रकाशित झाला आहे.