Coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी चक्क छत्र्यांचा वापर !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करण्यासाठी केरळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणार्‍या अलप्पुझा जिल्ह्यातील एका गावामधील नागरिकांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. येथील लोकांनी एकेमकांपासून सुरक्षित अंतर ठेवत सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करण्यासाठी चक्क छत्र्यांचा वापर सुरु केला आहे. अलप्पुझामधील गावातील ग्रामपंचायतींने प्रत्येक नागरिकाला छत्रीचे वाटप करण्याचे निर्णय घेतला आहे.

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ही कल्पना सुचवली होती. थानीयरमिक्काम या गावातील पंचायतीमधील अधिकार्‍यांनी छत्री उघडून एक व्यक्ती उभा राहिला तर त्याच्या आजूबाजूला म्हणजेच किमान एक मीटर अंतरावर कोणीच येऊ शकत नाही. याच माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे सूचित केले होते. लोकांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे म्हणून अलप्पुझा जिल्ह्यातील थानीयरमिक्काम गावातील ग्रामपंचायतीने घराबाहेर पडणार्‍या प्रत्येक व्यक्तीने छत्री घेऊन घराबाहेर पडणे बंधनकारक केले आहे.

छत्री डोक्यावर धरुन चालणार्‍या दोन व्यक्तींमधील किमान अंतर एक मीटर असते. सवलतीच्या दरामध्ये गावात छत्र्या वाटप करण्यात आली आहे. गावच्या ग्रामपंचायतीने अत्यावश्यक सेवेत काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि अंगवाडी सेविकांना या छत्र्या मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रायोजकांच्या मदतीने छत्री वाटपाचे काम करत आहोत. गरिबांना या छत्र्या मोफत देता याव्यात यासाठी आम्ही प्रयोजक शोधत आहोत. तसेच या छत्र्या गावकर्‍यांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्चमार्‍यांना मोफत छत्री वाटप केले जाणार आहे, असे मदनन यांनी सांगितले आहे.