Coronavirus in Amravati : अमरावतीत पुढील एक आठवड्याचा ‘Lockdown’, कडक नियम लागू

अमरावती : पोलीसानामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली. सोमवारी रात्री आठ पासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आज (रविवार) झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अमरावतीमध्ये काल (शनिवार) एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काही तासांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शनिवारी एक हजाराच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊनचा हा निर्णय पुढील एक आठवड्यापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

लॉकडाऊनची घोषणा करताना नवे निर्देशही देण्यात आले आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत.

1. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेला परवानगी
2. सर्व प्रकारची दुकाने, अस्थापने सकाळी 9 ते 5 पर्यंत सुरु राहणार
3. लग्नसमारंभासाठी 25 व्यक्तींना वधू-वरांसह परवानगी राहणार
4. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी शमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी
5. धर्मिक स्थळांमध्ये एकावेळी 10 व्यक्तींना प्रवेश
6. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील
7.अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागात संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे बंद राहतील.