Coronavirus : ब्रिटनमध्येदेखील टाळ्या आणि थाळ्यांचा ‘गजर’ ! ‘हॅरी पॉटर’ स्टार एमा वॉटसननं शेअर केला ‘व्हिडीओ’


पोलीसनामा ऑनलाईन :
22 मार्च 2020 दरम्यान जनत कर्फ्युशी दिवशी भारतात सायंकाळी 5 वाजता साऱ्यांनीच टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना कमांडोसोबत लढणाऱ्यांना सलाम केला आणि त्यांचे आभार मानले. आता ब्रिटेनमध्येही जनतेनं याच प्रकारे डॉक्टर्स, मेडिकल वर्कर्स अशा सर्व कोरोना कमांडोजचे आभार मानले आहेत. गुरूवारी ब्रिटेनच्या लोकांनी आपल्या घराच्या बाहेर उभं राहून थाळी आणि शिट्ट्या वाजवत नॅशनल हेल्थ सर्व्हीसचे आभार मानले.

हॉलिवूडची फेमस फ्रेंचाईजी हॅरी पॉटर अॅक्ट्रेस एमा वॉटसन हिनंही तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शअर सांगितलं की, ती मेडिकल स्टाफची आभारी आहे. व्हिडीओ टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज ऐकून येत आहे. व्हिडीओ शेअर करताना एमा म्हणते, “मी त्या देशाची असल्याचा मला गर्व आहे जो कोणालाही मेडिकल हेल्प देण्यासाठी तयार असतो. आमच्या मेडिकल वर्कर्सचा मला गर्व आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते इतरांची मदत करतात.”

एमा वॉटसन आणि ब्रिटेनच्या लोकांनी मिळून, इंग्लंडच्या रॉयल कुटुंबानंही डॉक्टर्स आणि मेडिकल वर्कर्ससाठी टाळ्या वाजवत आभार मानले. केंब्रिजचे प्रिन्स विलियम आणि प्रिंसेस कॅथरीनची मुले प्रिन्स जॉर्ज, प्रिंसेस शर्लेट आणि प्रिन्स लुईस यांनीही टाळ्या वाजवल्या. त्यांचाही व्हिडीओ समोर आला आहे.

कोरोनाननं जगभरातील 5,50,000 लोक बाधित झाले आहेत. जवळपास 25000 लोकांचा यामुळं मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णांची संख्या आता 900च्या पुढे गेली आहे. जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.