Coronavirus : मंगळसूत्रापेक्षाही मौल्यवान आहे ‘मास्क’, प्रचंड ‘व्हायरल’ होतोय ‘या’ विवाहीत जोडप्याचा फोटो

रायपूर : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन मुळे ज्यांचे लग्न ठरले आहे अशा जोडप्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. कोणी आपले लग्न पुढे ढकलले तर कोणी लॉकडाऊन मध्येच आपले छोटे खाणी विवाह आटोपले. असाच लॉकडाऊन मध्ये नुकताच १ विवाह सोहळा लॉकडाऊनचे नियम पाळून संपन्न झाला.

या विवाहाचे विशेष म्हणजे नवरदेवाने सर्वप्रथम आपल्या होणाऱ्या पत्नीला मास्क बांधले आणि त्यानंतर विवाह विधी उरकला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लग्नात नवरदेवानं होणाऱ्या पत्नीला आधी मास्क आणि नंतर मंगळसूत्र घातल्यानं त्याचं कौतुक होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बिलासपूरमध्ये लॉकडाऊनदरम्यान हे लग्न पार पडलं प्रेमाने मास्क बांधतानाचा या जोडप्याचा
फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सिंह देव यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे लग्न केल्याचा हा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यांनी या नवदाम्पत्य जोडप्याचे खूप कौतुक केले आहे.