Corona Cases in India : देशात कोरोनाची प्रकरणे 89 लाखांच्या पुढे; 24 तासात 38,617 नवे रुग्ण, 474 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे बुधवारी 89 लाखांच्या पुढे गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, बुधवारी देशात कोरोना संसर्गाची एकूण 38,617 नवी प्रकरणे समोर आली, तर 474 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच 44,739 लोक बरे झाले. सध्या देशात कोविड 19 संसर्गाची एकूण 8,912,907 प्रकरणे आहेत. एकूण प्रकरणांपैकी 5.11 टक्के अ‍ॅक्टिव्ह, 93.42 टक्के डिस्चार्ज आणि 1.47 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सांगितले की, मंगळवारी 9,37,279 लोकांचे सॅम्पलिंग झाले आणि आतापर्यंत 12,74,80,186 लोकांची तपासणी झाली आहे. देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 4,46,805 आहे, तर 83,35,109 लोकांना डिस्चार्ज किंवा बरे झाले आहेत, तर देशात कोरोना संसर्गामुळे 1,30,993 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 2,840 नवी प्रकरणे, 68 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 2,840 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर राज्यात मंगळवारी संक्रमितांची एकूण संख्या वाढून 17,52,509 झाली. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. अधिकार्‍याने सांगितले की, राज्यात संसर्गाने 68 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यात एकूण मृत्यूंची संख्या वाढून 46,102 झाली आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यात यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने 5,123 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे राज्यात संसर्गातून मुक्त होणार्‍या रुग्णांची एकूण संख्या वाढून 16,23,503 झाली आहे. राज्यात सध्या 81,925 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

मुंबई शहरात कोविड 19 ची 541 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर येथे संक्रमितांची एकूण संख्या वाढून 2,70,660 झाली आहे. शहरात आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या वाढून 10,599 झाली. पुणे येथे संसर्गाची 145, तर नागपूर येथे 115 नवी प्रकरणे समोर आली.