Coronavirus : देशात 24 तासात सर्वाधिक 294 ‘कोरोना’बधितांचा मृत्यु तर 9000 हजाराहून जास्त नवे रुग्ण

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक २९४ रुग्णांचा मृत्यु झाला असून सलग दुसर्‍या दिवशी ९ हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत.
गेल्या २४ तासात देशभरात तब्बल ९ हजार ८८७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ३६ हजार ६५७ इतकी झाली आहे. ४ जून रोजी देशात सर्वाधिक ९ हजार ८८९ नवीन रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांपैकी देशात १ लाख १५ हजार ९४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या २४ तासात देशभरात एकूण २९४ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला असून आतापर्यंत एकूण ६ हजार ६४२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात यापूर्वी २९ मे रोजी २६९ रुग्णांचा २४ तासात मृत्यु झाला होता. त्यापेक्षा काल अधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
गेल्या २४ तासात देशातील रुग्णालयातून एकूण ४ हजार ६११ रुग्ण बरे झाले. देशभरातील एकूण १ लाख १४ हजार ७३ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like