Coronavirus : 12 तासात ‘कोरोना’चे नवे 355 रूग्ण, ‘महाराष्ट्र-दिल्ली-गुजरात’मध्ये 6 जणांचा मृत्यू, देशाचा आकडा 2903 वर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 9 वाजता मागील 12 तासातील कोरोनाबाधितांची आकडेवारी सांगितली, त्यानुसार देशात कोरोनाचे नवे 355 प्रकरणं समोर आली. ज्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 2902 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 68 झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2902 पैकी 2650 लोकांवर सध्या उपचार सुरु आहेत तर यातील 183 लोकांवर उपचार पूर्ण होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर एक व्यक्ती उपचारानंतर आपल्या देशात परत गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 9 वाजता दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मागील 12 तासात 6 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. यातील 3 महाराष्ट्रातील आहेत, 2 दिल्ली आणि 1 गुजरातमधील आहे.

आंध्र प्रदेश आरोग्य विभागाने मागील 12 तासात राज्यात कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले. आंध्रप्रदेशात एकूण 80 प्रकरणं समोर आली आहेत.

आतापर्यंत 68 लोकांचा मृत्यू –
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा देशातील सर्वाधिक आकडा आहे. येथे 19 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 9, तेलंगाणामध्ये 7, मध्यप्रदेशात 6, दिल्लीत 6, पंजाबमध्ये 5, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये 9 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे तर आंध्रप्रदेश, तमिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेशात कोरोनामुळे 1 – 1 मृत्यू झाले आहेत.

आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयानुसार कोरोना व्हायरसचा प्रसार 29 राज्यात पसरला आहे. यात महाराष्ट्रात 423 कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तमिळनाडूनत 411 कोरोनाग्रस्त आढळले. तर दिल्लीत कोरोनाची 386 प्रकरणं समोर आली आहेत.

कोरोनाचं तबलिगी कनेक्शन –
दिल्लीत तबलिगी जमात आयोजन कोरोनाचे केंद्र बनले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची जी सर्वाधिक प्रकरणं समोर आली ती तबलिगी जमातीतील आहेत. दिल्लीत तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद आणि अन्यांच्या विरोधात महामारी रोग अधिनियम 1897 च्या अंतर्गत एक एफआयआर दाखल करण्यात आली आहे.