‘4 समोसा भिजवा दो’ ! ‘कंट्रोल’ रूमला फोन करणार्‍याला पोलिसांनी घडवली ‘अद्दल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे देशातील सगळे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. संचारबंदीच असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता इतर सर्व बंद आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे सर्वच जण आवाहन करत आहेत. मात्र, या लॉकडाउनच्या काळातही वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. घरातून पोलीस कंट्रोल रूमला फोन करून पोलिसांना चार समोसा भिजवा दो म्हणणार्‍याला मस्करी चांगलीच अंगलट आली.

उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात एकाने कंट्रोल रूमला फोन करून चार समोसा भिजवा दो, असा पोलिसांनाच आदेश सोडला. या व्यक्तीकडून वारंवार फोन केले जात असल्याने पोलिसांनी थेट त्यांचा शोध घेतला. रात्रीच त्याला पोलिसांनी शोधून त्यानंतर त्या व्यक्तीला नाला साफ करण्याचे काम दिले. एवढ्यावर न थांबता त्याच्याकडून नाला साफ करून घेतला. रामपूर जिल्हाधिकार्‍यांच्या ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणेवर ताण आलेला आहे. मात्र, अशातही पोलिसांना त्रास देणार्‍यांचा अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे अनेकांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार झेलावा लागत आहे. मात्र, एकाने चक्क पोलीस कंट्रोल रूमशी पंगा घेतल्याची शिक्षा त्याला ठोठाविण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like