Coronavirus In India : रुग्ण संख्या घटतेय ! 24 तासात 3.48 लाख नवी प्रकरणे, 3.55 लाख लोकांना डिस्चार्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना संसर्गाचा वेग थोडा कमी झाला आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी सुद्धा संक्रमितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त होती. देशात मागील 24 तासात 3 लाख 48 हजार 529 प्रकरणे समोर आली तर 4200 लोकांचा मृत्यू झाला. या दरम्यान देशात सुमारे 3 लाख 55 हजार लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, अजूनही मृतांचा आकडा कमी होत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी कोविड संक्रमित 3,876 लोकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी संसर्गाची 3,29,942 नवी प्रकरणे समोर आली होती.

दुसरीकडे केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले की, देशात कोविड-19 च्या नवीन प्रकरणात आणि संसर्गाने होणार्‍या मृत्यूंमध्ये घट झाल्याचे सुरुवातीचे परिणाम दिसून लागले आहेत. सरकारनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगना यांचा अशा 18 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सहभाग आहे जिथे कोविड-19 च्या रोजच्या प्रकरणांमध्ये घट होत आहे.

पुणे, नागपुर, पालघर आणि नाशीमध्ये प्रकरणे घटली
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कर्नाटक, केरळ, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, ओडिसा, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा अशा 16 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी आहे जिथे रोजच्या कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मागील दोन आठवड्यांपासून ज्या जिल्ह्यांमध्ये नव्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे पुणे, नागपुर, पालघर आणि नाशिक, उत्तर प्रदेशचे लखनऊ, वाराणसी आणि कानपुर नगर, मध्य प्रदेशचे भोपाळ आणि ग्वाल्हेर, गुजरातचे सूरत, बिहारमध्ये पाटणा, झारखंडमध्ये रांची, छत्तीसगढमध्ये दुर्ग आणि राजस्थानमध्ये कोटाचा समावेश आहे.

सातार्‍यात प्रकरणे वाढली
मागील दोन आठवड्यात ज्या जिल्ह्यांत कोविड-19 ची नवीन प्रकरणे वाढली आहेत, त्यामध्ये कर्नाटकचे बेंगळुरू शहर आणि मैसूरु, तमिळनाडुत चेन्नई, चेंगलापट्टु आणि तिरुवल्लुर, केरळात एर्नाकुलम आणि मलप्पुरम, पश्चिम बंगालमध्ये 24 उत्तर परगना आणि कोलकाता, राजस्थानात जयपुर, उत्तराखंडमघ्ये देहरादून, आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टनम, महाराष्ट्रात सातारा आडिसामध्ये खोरधाचा समावेश आहे.

मागील 24 तासातील आकडेवारी
* महाराष्ट्र – 40,956 नवी प्रकरणे, 793 मृत्यू
* मुंबई – 1,717 नवी प्रकरणे, 51 मृत्यू
* उत्तर प्रदेश – 20,463 नवी प्रकरणे, 306 मृत्यू
* छत्तीसगढ – 9717 नवी प्रकरणे, 199 मृत्यू
* दिल्ली – 12,481 नवी प्रकरणे, 347 मृत्यू
* गुजरात – 10,990 नवी प्रकरणे, 118 मृत्यू
* राजस्थान – 16,080 नवी प्रकरणे, 169 मृत्यू