Coronavirus : कोणत्या कारणामुळं मुंबई मात करतेय ‘कोरोना’वर, दिल्लीत वाढताहेत Covid-19 पॉझिटिव्ह केस

नवी दिल्ली : मुंबई – हिवाळा आणि प्रदूषण अशा संकटात सापडलेल्या दिल्लीची कोरोनाबाबतची स्थिती सध्या अगदी तशीच आहे, जेव्हा भारतात कोरोनाची सुरुवातीच्या वेळी मुंबईची होती. दोन्ही महानगरांना कोरोनाने वाईट प्रकारे प्रभावित केले. एकीकडे मुंबईची स्थिती ठीक होत आहे, तर दुसरीकडे दिल्लीची स्थिती बिघडत चालली आहे.

25 जूनला दिल्लीने कोरोना व्हायरस प्रकरणात मुंबईला मागे टाकले आहे. याचे सामान्य कारण हे आहे की, मुंबईत कोविडची प्रकरणे नियंत्रित झाली तर दिल्लीत नवीन प्रकरणे वेगाने सुरू आहेत. मुंबई जवळपास पाच महिने कोविडची हॉटस्पॉट होती. परंतु, आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोना नियंत्रित करण्यात यश मिळाल्यानंतर मुंबईची स्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे आणि हे रोल मॉडेलप्रमाणे सादर केले जात आहे.

दुसरीकडे, दिल्लीत पुन्हा कोरोना प्रकरणे वाढू लागली असून, नियंत्रण करण्याच्या पद्धतींवर तयारी सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच पार्शियल लॉकडाउनचा सल्ला दिला आहे. मुंबईत अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या जवळपास 11,000 आहे, तर दिल्लीची ही संख्या 42,000 आहे. मात्र, मुंबईत कोविडने मरणार्‍यांची संख्या दिल्लीच्या तुलनेत सुमारे 3,000ने जास्त आहे.

लॉकडाउनच्या नियमात अंतर
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र सरकारने सणाच्या काळातसुद्धा लॉकडाउनमध्ये शिथिलता न आणल्याने स्थिती आणखी गंभीर झाली नाही. विरोधकांच्या दबावानंतरसुद्धा राज्यात शाळा, धर्मिकस्थळे, मॉल, सिनेमा हॉल , रेस्टॉरंट आणि लोकल ट्रेनची परवानगी दिली नव्हती. याऐवजी सरकारने लॉकडाउनची नियमावली जारी केली होती. मुंबईने गणेशोत्वातही संयम दाखवला, दिवाळीतही स्थिती ठीक होती.

तर, दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणली. दिल्ली त्या शहरांपैकी एक होती, जिथे बाजार सर्वप्रथम खुले झाले, दारूची दुकाने उघडली गेली. कोरोना प्रकरणात सध्या झालेली वाढ सणाच्या काळात झालेली गर्दी आणि लोकांच्या एकत्र येण्याने झाली आहे.

कोरोना संसर्गात चाचणीची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईला सुरुवातीलाच समजले की, त्यांच्यासमोर मोठी समस्या आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाची वाढती संख्या नियंत्रित करणे सोपे नव्हते. महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्यांवर विशेष लक्ष दिले. मात्र, दिल्ली सरकारच्या डेटावरून समजते की, दिल्लीने मुंबईच्या तुलनेत तीन पट जास्त सॅम्पलची तपासणी केली आहे.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, तज्ज्ञ मान्य करत आहेत की, रॅपिड अँटीजन टेस्ट (आरएटी) ची संख्या दिल्लीत खूप जास्त आहे. दिल्लीने केलेल्या दोन तृतीयांश चाचण्या अँटीजेन होत्या, ज्यांना आरटी-पीसीआरच्या तुलनेत कमी विश्वसनीय मानले जाते.

रिपोर्टनुसार मुंबईत वरळी, बीकेसी, गोरेगाव आणि दहिसरमध्ये अनेक मेगा कोविड हॉस्पिटल स्थापन झाली. गंभीर रुग्णांसाठी वेगळी हॉस्पिटल बनवली गेली. येथे बेड्सची एकूण संख्या 17,467 आहे, ज्यापैकी 12,329 उपलब्ध आहेत. मुंबईच्या सार्वजनिक आणि खासगी हॉस्पिटलमध्ये एकूण बेड 14,462 आहेत, ज्यापैकी 9,734 उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे राजधानीला केंद्र आणि दिल्ली दोन्ही सरकारांच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा फायदा आहे, तरीसुद्धा शहरात आयसीयू बेडची आवश्यक संख्या नाही. मुंबईच्या तुलनेत दिल्ली मेकशिफ्ट कोविड हॉस्पिटल बनवू शकली नाही.